Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

तुळशी विवाह माहिती आणि कथा

तुळशी विवाह माहिती आणि कथा

विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव.कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे.हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणुन अनन्यसाधारण महत्त्व आहे.तुळशीस घरातीलच कन्या मानुन,घरातील तुळशी वृंदावन वा कुंडिची गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात.त्यावर बोर चिंच आवळा,कृष्णदेव सावळा असे लिहितात.बोर,चिंच,आवळा,सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात.त्यात देव्हार्‍यातील बाळकृष्णाची मुर्ती ठेवतात.तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात.त्यावर मांडव म्हणुन उस वा धांड्याची खोपटी ठेवतात. त्यानंतर,दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणुन त्यांचा विवाह लावला जातो.घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतु आहे.

तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक व्दादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यत: व्दादशीला करतात.



कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर विज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला व्दादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुध्द नवमीला विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.

एकदा एक गंध्यानं तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने त्याने स्त्री वेष घेऊन त्या माळिणी बरोबर तो किशोरीकडे आला. ती माळिण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधा किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हा ही किशोरीवर मोहित झाला. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितलं की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा विज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्या सारख्या देवाला तिचं वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न् पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडीलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजला हा विवाह मान्य करणं भाग पडलं. कार्तिक व्दादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळलं. तो खूप दु:खी झाला, व त्याने ठरवलं की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर विज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळलं.


असा करावा तुळशी विवाह!

tulsi vivah

कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. परंतु, काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो.

तुळशी व‍िवाह कसा करावा?
* तुळशी व‍िवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी.
* मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा.
* चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा.
* यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा.
* यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे.
tulsi vivah

* गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे.
* मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे.
* यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी.
* नंतर वस्त्र व आभूषणे घालावित.
* नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे.
* शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.



 
Labels:

Post a Comment

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget