Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन

देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.

आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने उत्साहाने साजरे करतो. त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा ‘प्रजासत्ताक दिन’आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो २६ जानेवारीला.
हा दिवस शाळा कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती निवृत्त अधिकारी नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजपासून कवायती. भाषणे विविध कार्यक्रम केले जातात. लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात. राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाश तुटले… आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल. लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी सुपुत्र ह्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे.

दरवर्षी २६ जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलकही प्रस्तुत केली जाते.

 हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो.


Labels:

Post a Comment

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget