Halloween Costume ideas 2015

आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.

2018
Aai Aai/Baba Aarti Prabhu Aashadi Ekadashi Aathvan Aayushya Adarsh Vyaktimatva Akshay Tritiya Anna Hazare Ashru Baba Baiko Balasaheb Thackeray Balpan Bhaubeej Bhavana Bhet Breakup Chandrashekhar Gokhale Charolya Cricket Dasara Datta Jayanti Dev Dhantrayodashi Din Vishesh Diwali Dr. Ambedkar Jayanti Dukh Durava Ektepana Gadge Maharaj Ganpati Gokulashtami Gudi Padwa Guru Poornima Hanuman Jayanti Holi Itar Kavita Jagatik Mahila Din Jai Satguru Jivan Kamlesh Gunjal Kavi Grace Kojagiri Purnima Kshan Premache Kusumagraj Lagna Lakshmi Pujan Lal Bahadur Shastri Lata Mangeshkar Lokpriya Kavi Maasaheb Jijabai Jayanti Maharashtra Din Mahashivratri Mahatma Jyotiba Phule Maitri Maitri Divas Maitrin Makar Sankranti Mangesh Padgaonkar Mann Marathi Bhasha Din Marathi Kavita Marathi Lekh Marathi Prem Kavita Mithi Mitra Mumbai Terrorist Attacks Najar Nanashaheb Dharmadhikari Narali Purnima Nate Nav Varsh Navratri Odh Pahila Paus Pahila Prem Pahili Bhet Pandharpur Wari Paus Kavita Prajasattak Din Prem Prem Divas Prem Mhanje Nakki Kai Aste Prem Patra Premat Priyasi Pu. La. Deshpande Rahul Dravid Rakhi Purnima Rakhshabandhan Ramdas Swami Rangpanchami Republic Day Sachin Tendulkar San-Utsav Sandeep Khare Sandhyakal Saumitra Shala Shanta Shelke Shikshak Din Shivaji Maharaj Shivjayanti Shravan Shree Ram Navami Shri Parshuram Jayanti Shringar Shubh Din/Shubh Ratra Sindhutai Sapkal Sobat Sparsh Sukh Sundari Suprabhat Suresh Bhat Suvichar Swami Vivekanand Swapna Swapnasundari Swatantra Din Tu Tu Aani Me Tu Yetes Tevha Tujhyasathi Tujhyavina Tulsi Vivah Ukhane Va. Pu. Kale Vaat Vadhdivas Valentine's Day Vande Mataram Vapurza Vasu Baras Vat Savitri Veer Savarkar Jayanti Vel vidamban Vinda Karandikar Vinodi Vinodi Kavita Viraha Vishwas

दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी?
चंद्रपूर येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ४ मार्च १९८९ ला पुलंनी केलल्या भाषणातला अंश...
आयुष्यात माणसाला निखळ माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा मंत्र मला केशवसुतांच्या ‘ मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदी न मला साहे ’ या ओळीत सापडला. शाळकरी वयापासून आजतागायत केशवसुतांना मी अनेक वेळा भेटत आलो. माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांसाठी केशवसूत आजही गातचि बसले आहेत. वाढत्या वयाबरोबर आसपास पाहायला लागल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या मळ्याला जात, धर्म, राष्ट्रीयत्त्वाच्या भ्रामक कल्पना, देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाक अशा नाना प्रकारची नाना कारणांनी उभारलेली असंख्य कुंपणं दिसायला लागली.
ऐहिक आणि पारलौकिक दहशतीच्या दगडांच्या भिंतीची ती कुंपणं होती. अशा या अंधा-या वातावरणात जगणा-यांच्या जीवनात वीज चमकावी, गडगडाट व्हावा, मुसळधार पाऊस कोसळून नांगरल्याविण पडलेल्या भूमीवर नवं पीक येण्याची चिन्हं दिसावी अशी अवस्था झाली. बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे ‘ धम्म ’ . ‘ धम्म ’ या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ‘ धम्म ’ असं आहे.
बाबासाहेब हे सामाजिक शोषणाच्या पाळामुळाशी जाऊन कुदळ चालवणारे पहिले क्रांतिकारक म्हणायला हवेत. उन्मत्ताच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रुढी पाळणा-या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनवण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती.
दलित साहित्याचं जे सूर्यकूल आपण मानतो त्याची पहाट महाडच्या क्षितीजावर फुटली होती, असं म्हणायला पाहिजे. शरसंधानासारखं हे शब्दसंधान होतं. एका नव्या त्वेषाने पेटलेल्या कवींना आणि कथा-आत्मकथा-कादंबरीकारांनी या प्रतिमासृष्टीतून वास्तवाचं जे दर्शन घडवलं, ते साहित्यात अभूतपूर्व असं होतं. जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्चनीच भेद ठरवणा-या रुढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. ‘ बहुजन हिताय बहुजन सुखाय ’ हीच मुळी या साहित्याची मूळ प्रतिज्ञा आहे. वास्तवाशी इमान राखून तिथे पदोपदी जाणवणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, या ध्येयाने प्रेरित झालेले हे साहित्य जन्मजातच दुय्यम दर्जाचे, असा साहित्यिक हिशेब मांडणा-यांना दलित साहित्य हा शब्द खटकणारच.
दलित शब्दाची व्याप्ती लक्षात न घेणा-यांना दलित संमेलन हा सवतासुभा वाटतो. पण ही विचारसरणी नवी नाही. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विश्वव्यापी विचार घेऊन लढलेल्या आंबेडकरांना हिंदू समाजातल्या अस्पृश्यांचे पुढारी म्हणून एका कुंपणात टाकून देण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या साहित्यालाही अशाच प्रकारचं लेबल लावून त्यामागील व्यापकता आकुंचित करण्यात आली तर त्यात नवल नाही. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल. पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे, असं मी मानतो.

प्रेम हे काही सतत बडबडण्यात आणि एकमेकांच्या पुढं पुढं
करण्यात नसतं.
प्रेम हे मनात असतं आणि वेळ आली की आपोआप ते
एखाद्या कृतीतून व्यक्त होतं.
त्यासाठी वेगळं धडपडावं लागत नाही.
त्याचं प्रदर्शन मांडावं लागत नाही.
- राजन खान

आपण आपला मार्ग निवडतो ?
 की रस्तेच आपल्याला येउन गाठतात....
कारण रस्ता चुकलेले कितीतरी जण
आपल्याला पावलो पावली भेटतात !
- चंद्रशेखर गोखले

सांज सकाळी कातरवेळी
 येतात नेहमी तुझ्या आठवणी आठवणी
 त्या मन करतात उदास
 तेव्हा खरंच हवा असतो हळवा स्पर्श तुझाच
 -मनीषा
from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2pFU9nl
via IFTTT


शिव्या ह्या लोखंडा सारख्या असतात,
नाही वापरल्या तर त्यांना गंज चढतो...
राग आल्यावर योग्य शिव्या घातल्या की राग शांत होतो...
योग्य माणसाला योग्य वेळी योग्य शिवी घातली की आत्मसमाधान मिळतं...
शिव्या सोडून जगात असे कोणतेही शब्द नाहीत ज्यांनी राग शांत होतो...
शिव्या द्या, पण त्या योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य द्या...
प्रश्न ...शिव्यांचा जन्म कसा झाला?
उत्तर :- शिव्या खाण्याच्या लायकीच्या लोकांचा जन्म झाला त्याच क्षणी शिव्यांचा जन्म झाला...
*१११ मराठी सभ्य– शिव्या.*
१) नालायक ....
२) मुर्खा....
३) बावळट....
४) डुक्कर ....
५) टरमळया
६) नरसाळया....
७) सुरनळया....
८) दळभद्री....
९) दलिंदर....
१०) फुकटया
११) कुत्र्या....
१२) वाकटया....
१३) बावळया....
१४) गाढव....
१५) बुचकळ्या
१६) ये गाजर ....
१७) उड़ानटप्पू...
१८) छमिया....
१९) बोंगाडया....
२०) पोंग्या
२१) माठया....
२२) बैल ....
२३) बैलोबा...
२४) सुक्क्या....
२५) ठोल्या..
२६) मोट्या
२७) म्हासाड...
२८) सांड ....
२९) हूडडिंगा....
३०) धटिंगन...
३१) आवाकाळी....
३२) मंद
३३) ढिल्या...
३४) च्यायला..
३५) मायला...
३६) बायल्या....
३७) गाभ्न्या...
३८) च्यामारी
३९) कान्या ...
४०) कापिंदर ....
४१) एपितर...
४२) झेंडू....
४३) जाड्या....
४४) बाचक्या
४५) ढेरपोट्या....
४६) थेरड्या....
४७) शेळपट....
४८) मेंगळट....
४९) ढेम्स्या...
५०) सुक्कड
५१) खेकड्या....
५२) डुरक्या....
५३) झिन्ग्या....
५४) बेडूक....
५५) झिपऱ्या...
५६) टकल्या
५७) बेशरम....
५८) बदमाश...
५९) निर्लज्ज...
६०) निलाजरा...
६१) बिनडोक..
६२) टमरेल
६३) खटारा....
६४) भागुन्या...
६५) टपरी...
६६) छपरी....
६७) तुसाड्या...
६८) नसान्या..
६९) बडबड्या..
७०) सापळ्या...
७१) मोक्कर...
७२) बधीर....
७३) गेंड्या...
७४) वेड्या...
७५) येड्या..
७६) येडपट...
७७) मेंटल
७८) सर्किट...
७९) चक्रम..
८०) भेकड..
८२) घनचक्कर...
८३) फटीचर...
८४) फाटक्या...
८५) खुळ्या...
८६) भामट्या..
८७) राक्षसा...
८८) कडमडया...
८९) दारुड्या..
९०) बेवड्या...
९९) पेताड...
१००) डाम्बिस.
१०१) भवाने...
१०२) डाकिन...
१०३) चेटकीण..
१०४) टकल्या...
१०५) मरतुकड्या..
१०६) ढोरा...
१०७) खप्पड..
१०८) बहिऱ्या..
१०९) मुक्या
११०) फुकड्या..
१११) अल्लड
रोजच्या व्यवहारात वापरा आणि आपली सभ्यता जपा.
लाभले भाग्य आम्हास,
बोलतो मराठी.
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..!!!
( शिमग्याच्या खच्चुन शिवेच्छा !) 🚩
 from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग http://ift.tt/2oJACkE
via IFTTT


मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वाचलेला मराठी भाषेवरचा सर्वात सुंदर मेसेज.
माझा लय जीव हाय ह्या बाईवर. मस्त, मोकाट, उंडारल्या खोंडासारखी भाषा! लावल तितके अर्थ कमी! पंढरपूरच्या घाटापासून ते पुण्यातल्या पेठेपर्यंत किती कळा तिच्या अंगात!
नाकातून आवाज आला की लगेच कळतं की कोकणातून लेले किंवा नेने आलेत. "रांडेच्या" म्हणले की लगेच कोल्हापुरी पांढरा रस्सा आठवतो. " का बे छिनालच्या" म्हणलं की सोलापूरची शेंगा चटणी आणि "पोट्ट्या" म्हणल की नागपुरी सावजी जेवण. पोरीच्या तोंडून "मी तिथे गेलो" ऐकू आल की सांगली आणि "भेंचोद" म्हणलं की मुंबई!! "काय करून राहिला?" म्हणलं की नाशिक, "का करूलालाव?" म्हणलं की लातूर आणि "विषय संपला" म्हणलं की पुणे!! हेल काढून बोललेला नगरी किंवा बीडचा आणि "ळ" चा "ल" केला की कोकणी! एका वाक्यात माणसाचं गाव कळतं.
हिंदी बोलताना तर मराठी माणूस लगेच कळतो. आमच्या इतकी हिंदीची चिंधी कुणीच केली नसेल. मराठी माणसाचे हिंदी आणि मुसलमान बागवान लोकांची मराठी म्हणजे विष विषाला मारते त्यातला प्रकार. "हमारी अडवणूक हो रही है" हे मराठी हिंदी आणि "वो पाटी जरा सरपे ठिवो" ही बागवानी मराठी ऐकून मी लय खुश होतो राव! मराठी खासदार आणि राजकारणी लोकांचं हिंदी ऐकून तर हिंदी पत्रकारांना घाम फुटत असावा.
एकाच गोष्टीला प्रतिशब्द तर किती? बायको, पत्नी, सौभाग्यवती, अर्धांगिनी, सौ, खटल, कुटुंब, बारदान, बाई, गृहमंत्री, मंडळी इत्यादी सगळ्याचा अर्थ एकचं! "इ" सारख्या आडवळणी शब्दापासून पण सुरु होणारे कितीतरी वेगवेगळे अर्थाचे शब्द.. जसे की "इस्कोट", "इरड करणे", "इरल", "इकनं". "ग्न" ने शेवट होणारे चार शब्द मराठीत आहेत ... लग्न, मग्न, नग्न आणि भग्न. किती मस्त क्रम आहे ना? हे "ग्न" बाबत आमच्या मास्तरच ज्ञान!
इदुळा, येरवा, आंवदा, कडूस पडाय, झुंजूमुंजू, दोपार, सांच्याला, रातीला, तांबडं फुटायला यातून जो वेळ कळतो त्याची मजा am, pm ला कधीच येणार नाही. कोरड्यास, आमटी, कट, शेरवा, तर्री, शॅम्पल यातला फरक कळायला महाराष्ट्र उभाआडवा बघावा लागतो. खेकडा कुठला आणि चिंबोरी कुठली? उंबर कुठलं आणि दोड्या कुठल्या? शाळू, ज्वारी आणि हायब्रीड यातला पोटभेद कळायला रानातली मराठी लागते. कडवाळ कुठलं न मका कुठली हे शेरातला शाना कदीबी सांगू शकत नाय!
खाण-पिणं असू द्या, जनावरं-जित्राब असु द्या, शिव्याशाप असू द्या, लाडाची नाव असू द्या, वेळ-काळाची गणित असू द्या, हुमान-कोडी असुद्या, ओव्या-अभंग असू द्या, अंगाई असू द्या, सणवार असू द्या, झाडाझुडुप असू द्या, शेतीची औजार असू द्या, कापडं-चोपड असू द्या नाहीतर अजून काही, मराठी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक गावात, शहरात, कामात, धंद्यात ... सगळीकडे मराठीचा वेगळा बाज असतो, अंदाज असतो आणि लकब असते. दिवसातन 5 वेळा कपडे बदलणाऱ्या अवखळ, सुकुमार पोरीसारखी ही भाषा सगळीकडे नवनवे रंग उधळत असते.
माय मराठी... तुझ्यावर लय जीव आहे बाये!!! अशीच उंडारत राहा... वारं पिलेल्या खोंडासारखं!!
- डॉ. विनय काटे

from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग http://ift.tt/2CMjTC1
via IFTTT



*आज्जीने आधुनिक रितीने सांगितलली पौराणिकगोष्ट*
*इंटरनेटच्या माध्यमातून*
. "3G!की दत्तगुरू!!”
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त" भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता,इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला.
'एव्हरीटाईम हे काय म्हणत असतेस तू आज्जी ?'
'ही माझ्या जपाची " *टॅग लाईन* " आहे.'
'पण हे म्हणत असलीस की तुझं माझ्याकडे लक्षच नसतं' फुरंगटलेल्या रोहिनची तक्रार.
रोहिनचा रूसवा दूर करण्यासाठी,पटकन संवाद साधला जाण्यासाठी म्हणून त्याच्या स्टाईलच्या मराठीचा आधार घेत मी म्हटलं,
‘बच्चमजी,व्हिडिओ गेम -मोबाईल मध्ये रमलात की आपणही माझ्या प्रश्नाला आन्सर देत नाही. अगदी तश्शीच मी पण "3G"मध्ये रमून जाते.'
'आज्जी,"हे" म्हणायला यू आल्सो नीड "3G"?'
रोहिनच्या चेहरयावरचं आश्र्चर्य बघून मला हसू आवरलं नाही.त्याला समजवायला म्हटलं,
'अरे,दत्तात्रय म्हणजे 'ब्रम्हा -विष्णु -महेश" *टुगेदर* म्हणजे "3G"च नाही का ?अर्थात माझ्या आणि हल्ली सगळ्यांची 'नीड' असलेल्या "3G" मध्ये एक मेजर फरक आहे.'
'फरक म्हणजे डिफरन्स,राइट?तो कोणता?' रोहिनने खात्री करण्यासाठी विचारलं.
'सांगते! *सगळे ज्याचे फॅन झालेत 'ते "3G" मिळतंय की नाही ,नसेल तर कोणत्या डायरेक्शनला मिळेल हे सर्व चेक करावं लागतं.पण मी नुसतं "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असं म्हटलं तरी इनफ आहे*
'का ?असं का ?आणि "दिगंबरा" म्हणजे ?' रोहिनच्या अनेक शंका धडाधड बाहेर आल्या.
'अरे,"दिगंबरा"चा अर्थ सर्व दिशांना व्यापून राहिलेला म्हणजे स्प्रेड होऊन राहिलेला."दिगंबरा"
हे दत्ताचं अजून एक नाव आहे.'
या अशा संवादानंतर "3G" ची गोष्ट सांगण्याची रोहिन मागणी करणार याची मला खात्री होती.
'So श्रीदत्त म्हणजे *3 in one* देव आहे?कसं काय? सांग ना आज्जी ' गेममध्ये पाॅझ घेऊन माझ्याजवळ येऊन रोहिननं विचारलं.अशा सुवर्ण संधीचा लाभ सोडून देणं मला शक्यच नव्हतं.मी लगेचच गोष्टीला सुरूवात केली.
'दत्तात्रय या नावातच त्यांच्या वडिलांचं नाव लपलेलं आहे.पिता अत्रीऋषी आणि माता अनुसूया यांचा सुपुत्र means son म्हणजेच "श्रीदत्तात्रय"!फार पूर्वींची गोष्ट-अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी "ब्रम्हा-विष्णु-महेश" या देवांची कठोर आराधना केली.'
'कठोर आराधना म्हणजे?' मला मध्येच अडवत रोहिनचा प्रश्न आलाच.
'म्हंजे *"hard worship*!त्याला मराठी शब्द अर्थासहित समजावणं हे माझं आवडतं काम. मातृभाषेची हसतखेळत ओळख करून द्यायला "गोष्ट" हे एक उत्तम साधन आहे असं मला वाटतं.
'म्हणजे गेममध्ये वरची लेव्हल क्राॅस करायला मला जसं *continuous hard try* करायला लागतं....'
त्याच्या विश्वातल्या गोष्टींशी अर्थ रिलेट करण्याच्या रोहिनच्या प्रयत्नाची गंमत वाटून मी पुढे सांगायला सुरूवात केली.
'अत्रीऋषींच्या आराधनेमुळे ब्रम्हा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रसन्न झाले.अत्रीऋषी -अनुसूयेला "त्रिदेव पुत्रप्राप्ती" झाली म्हणजेच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला.दत्तजयंतीच्या दिवशी "त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा...."ही आरती आपण म्हटलेली आठवतेय ?'
मला मध्येच थांबवत रोहिनची प्रतिक्रिया आली,
‘आरतीमध्ये "त्रैमूर्ति" का म्हटलंय ते आता मला कर्रेक्ट समजलंय आजी. *पण दत्ताच्या तसबिरीमध्ये गाय,कुत्रे एटसेट्रा का असतात आज्जी* ?'
खरंतर त्याच्या तोंडून 'तसबीर' हा शब्द ऐकून मला अगदी गहिवरून आलं.माझे 'मराठी प्रयत्न' रूजतांना पाहून छान वाटतं होतं.पण आधीच चमकदार असलेल्या रोहिनच्या डोळ्यातली उत्सुकता अधिक न ताणता मी म्हटलं,
*'पृथ्वी म्हणजे "मदर अर्थ" कशी एखाद्या आईप्रमाणे सगळ्यांच्या डिमाण्डस् फुलफिल करते. तसबिरीतली गाय हे पृथ्वीचं "प्रतिक" आहे."प्रतिक" म्हणजे symbol.* आता पहा ,ते *"3G" symbol* दिसत असलं की सगळे कसे खूश असतात.त्यामुळेच तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण होतात नं! ४कुत्रे हे आपल्या वेदांचं प्रतिक आहे-"ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद" !'
'वेद म्हणजे काय आजी ?' रोहिननं अधीरपणे विचारलं.
खरं तर "वेद" म्हणजे काय हे सोप्पं करून सांगणं हे खरोखरच अवघड काम होतं.
तरिही मी म्हटलं,
'काही माहिती हवी असेल,काही क्वेरी असेल,
काही अडलं असेल तर हल्ली सर्वजण *विकिपिडिया रिफर करतात* राइट ? *वेद' म्हणजे आपल्या अॅन्सेस्टर्सनी जपलेलं* "ज्ञानाचं भांडार" आहे * ' त्याला चटकन समजेल अशा प्रकारे समजावण्याचा मी आपला एक प्रयत्न केला.
'व्हेरी इंटरेस्टींग आज्जी.अजून सांग नं 'आता रोहिनला राहवेना.
'शंख-चक्र हे श्रीविष्णुचं तर त्रिशूल-डमरू हे श्रीशिवाचं प्रतिक आहे.मला आठवतंय ,तू एकदा मोबाईलमधले डमरू आणि चक्र चे सिम्बाॅल दाखवले होतेस,हो नं?'
'अगदी बरोबर आज्जी, *ब्लूटूथ* साठी डमरू आणि *जनरल सेटिंग्ज* ला चक्र "अशा साइन्स असतात.
आज्जी हे थोडंसं ब्राॅड पण *व्हाॅटस्अॅपच्या साइन सारखं दिसतंय ते काय आहे*?'
'अरे त्याला कमंडलू म्हणतात.कमंडलू आणि जपमाला हे श्रीब्रम्हाचं प्रतिक आहे.'
व्हाॅटस्अॅपच्या सिम्बालशी त्याने शोधलेल्या साधर्म्याचं मला मनात कौतुक वाटत होतं.माझ्या गोष्टीचे तपशील त्याला आवडलेत असं लक्षात येत असतानाच पुढचा प्रश्न आला.
*पण मग आज्जी श्रीदत्तांचा जप करतांना तू "अवधूत चिंतन ....."असं का म्हणतेस*?अवधूत म्हणजे ?'
'अवधूत हेही श्रीदत्ताचंच नाव आहे.ह्या नावाचं मिनिंग आहे "नेहमी आनंदात,वर्तमानात रहाणारा".
म्हणून तर मी म्हटलं की ही माझ्या जपाची " *टॅग लाईन* आहे,नेहमी आनंदात ठेवणारी.पहा,
आजकाल "3G" चा टॅग स्पष्ट असेल तर असतात की नाही सगळे आनंदात अन् अपडेटेड?
काय?'
रोहिनला मनापासून हसू आलं ,अन् अर्थातच मलाही!खूपशा मराठी शब्दांची अर्थासहित रोहिनला ओळख करून दिली,एक पौराणिक कथा त्याला आवडेल अशा पध्दतीनं सांगता आली ह्याचा मलाही आनंद वाटला.
सध्याच्या "4G" च्या जमान्यात मी रोहिनला माझ्या "3G" शी कनेक्ट करू शकले.आणखी काय हवंय माझ्यासारख्या आज्जीला ?
अनुजा बर्वे.
प्रसिध्दी- स्वप्ना दिवाळी अंक २०१७


साधन मदिरा

व्यथा वेदना विसरायाचे साधन मदिरा
स्वतः स्वतःला फसवायाचे साधन मदिरा

गतकाळाच्या रंगमहाली मैफल सजते
भणंग स्वप्ने सजवायाचे साधन मदिरा

बंद उसासे , बंद हुंदके , बंद ओठही
दोन आसवे ढाळायाचे साधन मदिरा

जी काही नासाडी होते ती देहाची
झुरणारे मन रिझवायाचे साधन मदिरा

आनंदोत्सव असेल अथवा असो दुखवटा
झुलवायाचे फुलवायाचे साधन मदिरा

कुरतडणार्‍या कातरणार्‍या कातरवेळी
एकाकीपण रिचवायाचे साधन मदिरा

तुटले फुटले कुस्करले वा जरी चिरडले
सारे काही सांधायाचे साधन मदिरा

रोखुन धरलेल्या श्वासासम कितीक गोष्टी
बंद कवाडे उघडायाचे साधन मदिरा

उजाड झाल्या नगरामध्ये पुन्हा एकदा
नवीन इमले बांधायाचे साधन मदिरा

जे काही कोरले ” इलाही” ह्रुदयावरती
पुसण्यासाठी गिरवायाचे साधन मदिरा

– इलाही जमादार


😊💞 !!..#_तू_मला_मिठासारखी..!! 💞😊
••••••••••••••••••••••••🌹•••••••••••••••••••••••••
सत्यभामा आणि रुक्मीणी या आपल्या दोन बायकांशी एकदा भगवान गोपालकृष्ण गप्पागोष्टी करीत बसले असता, गप्पांच्या ओघात सत्यभामेनं विचारलं, 'नाथ, मी आपल्याला कशी प्रिय वाटते.?' गोपालकृष्ण म्हणाले, 'सत्यभामे ! तु मला श्रीखंडासारखी प्रिय वाटतेस.' लगेच रुक्मिणीनंही तोच प्रश्न भगवंताला विचारला असता ते मुद्दाम म्हणाले, तू ना रुक्मिणी ? तु मला मिठासारखी, प्रिय वाटतेस..!!
आपण आपल्या पतीला श्रीखंडाप्रमाणे प्रिय असल्याचे ऎकून सत्यभामा बेहद्द खुष झाली, तर 'पतीला आपण मिठाप्रमाणे वाटतो, 'असं कळताच रुक्मिणी तिथून रागानं तरातरा-निघून गेली. आपल्याला सर्वात अधिक प्रिय असलेली रुक्मिणी रागावल्याचे पाहून, गोपालकृष्णांनी स्वयंपाक्याला त्या दिवशी स्वयंपाकात मीठ बिलकूल न घालण्याची सूचना केली आणि जेवणात गोडाची वस्तू म्हणून श्रीखंड करायला सांगितले. स्वयंपाक तयार झाला.
अगदी सुचनेनुसार पुर्णपणे आळणी. गोपालकृष्ण जराही कुरबुर न करता नेहमीप्रमाणे पोटभर जेवले. त्यांच्यानंतर रुक्मिणी व सत्यभामा या जेवायला बसल्या. वरणभाताचा पहिला घास तोंडात घालतात, तो वरणाला मीठ नाही. आमटी व भाजी चाखून बघितली, तर त्यांचीही तीच गत ! अगोदरच रागावलेली रुक्मिणी स्वयंपाक्यावर खेकसून म्हणाली, 'आज स्वयंपाक करताना तुझं लक्ष कुठे दुसरीकडे होतं का?' स्वयंपाक पार आळणी झालाय !' भगवंताच्या सुचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला, 'आज मीठ संपल होत म्हणून स्वयंपाक आळणी करणं भाग पडलं. अर्थातच श्रीखंड होतं; तेव्हा बाकीच स्वयंपाक आळणी असला तरी निभावून नेता येइल, असं मला वाटलं.'
रुक्मिणी म्हणाली, 'श्रीखंडाशिवाय जेवण अडून रहात नाही. इतर सर्व स्वयंपाक चांगला असला की झालं, आणि इतर सर्व स्वयंपाक मिठाशिवाय चांगला होणं शक्य आहे का ?' रुक्मिणीन पानात प्रथम वाढलेलं अन्न कसंबसं संपवलं, आणि ती अर्धपोटीच उठून आपल्या महालात जाऊन फुरंगटून बसली. तिच्या पाठोपाठ गोपालकृष्ण तिच्या महालात गेले आणि मुद्दाम म्हणाले, 'रुक्मिणी आज तुझं जेवण एवढ्या लवकर कसं झालं ? मला वाटलं, आज जेवणात श्रीखंडाचा बेत आहे, तेव्हा जेवणाचा सावकाश आस्वाद घेत घेत होणार...
रुक्मिणी रागानं म्हणाली, 'श्रीखंडाचं कौतुक तुम्हाला; मला नाही. बाकीचा स्वयंपाक नुसता आळणी होता; आणि कारण विचारलं तर बल्लवाचार्य म्हणतो, मीठ संपून गेलंय ! मिठाशिवाय स्वयंपाकाला जरातरी चव येईल का?' यावर गोपालकृष्ण पटकन म्हणाले, ' मीठ नाही म्हणजे स्वयंपाकाला चव नाही, हे तुच म्हणतेस ना ? मग मी मघाशी म्हणालो की तू मला मिठासारखी प्रिय आहेस. अग, तुझ्याशिवाय माझं जीवन बेचव होऊन जाईल.' पतीच्या बोलण्यातली ही खोच लक्षात येताच रुक्मिणी कळी एकदम खुलुन गेली..!!


|| गणेश जयंती हार्दीक शुभेच्छा ||
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांनासुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.👏🏻
!! गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!
💐🐀🐀🐀🐀🐀

MarathiKavitaBlog

{facebook#https://www.facebook.com/marathikavitablog} {twitter#https://twitter.com/mkavitablog} {google-plus#https://plus.google.com/+MarathikavitablogBlogspot} {instagram#https://www.instagram.com/marathikavitablog/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget