असतेस जेव्हा तु माझ्याबरोबर
बेधुंद वागतो तेव्हा मी खरंतर
तु नसलीस की मग तुझ्या आठवनींना उधाण येई
तुझ्या आठवनीं सोबत
दिवस सरतो सहज पण ती कळोखी रात्र सरत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
दिवस उतरावा तसे तुझे
विचार मनात उतरतात
हळुच मग मनाच्या
हळव्या कोन्यातली नाजुक तार छेडतात
तुझ्या त्या विचारांनी मी मात्र घायाळ होई
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
एकटा वाटेवर चालतानाही
तुझी सोबत सतत जाणवी
मागे वळुण पाहताना
माझ्याच सावलीत मी नेहमीच तुझं चित्र पाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तु समोर असल्यावर तुझ्या डोळ्यात
मी स्वत:चे प्रतीबिंब पाही
त्या प्रतीबींबातही मी तुझी साथ शोधण्याचा प्रयत्न करी
पण नेमकं तेव्हाच तु पापण्या मिटतेस
का ? गं अशी मला तु नेहमीच छळतेस
पण त्या छळण्याने मात्र कधीही त्रास होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तु जवळ असल्यावर तुला मी स्पर्श करु पाही
तुला मी स्वत:च्या प्रेमळ मीठित घेउ पाही
पण देव जाणे का ? माझं कधी धाडसंच होत नाही
जवळ असुनही कसला हा दुरावा
आता खरच हे सगळ सहन होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
@सचिन काकडे
#MarathiKavitaBlog