Showing posts with label Datta Jayanti. Show all posts
Showing posts with label Datta Jayanti. Show all posts

Wednesday, December 11, 2019

श्री दत्त जयंती

अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा||

श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा.
आपल्या कुटुंबातील सगळ्यांना भरभरून आयुष्य लाभो ,
 आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच श्री गुरुदत्त चरणी प्रार्थना ||


Thursday, December 24, 2015

।।दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।।

।।दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।।
या मंत्रा मध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी- त्याचे अनुसंधान. मी देह नाही. मी आहे आत्मा.तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम्.तो साक्षी आहे. निर्विकार आहे.अानंदरूप आहे.पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहम् ला हाक मारली आहे.
दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रम्हाचे अनुसंधान केले आहे.आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे.वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे,परब्रम्हच आहे.परब्रम्हानेच ही अनेक भासणारी रुपे धारण केली आहेत.त्या परब्रम्हाला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे.
श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपादवल्लभांना हाक मारली आहे.श्रीपादवल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत.ते भगवंताचेच अवतार आहेत.त्यांना संबोधन केले आहे.
चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे.माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा. मला लवकर आपल्या जवळ न्या. आपले स्वरुप मला प्राप्त होऊ दया. मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे.तो भ्रम नाहीसा करा. अहं ब्रम्हास्मि हा अनुभव मला येऊ दया. आपल्या सारखी दिगंबर स्थिति मलाही दया. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात आहे.
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा ।।
प.पू. श्री दत्तमहाराज कवीश्वर

Monday, December 16, 2013

!!....दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...!!

!! दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...!!

अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः।
स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् ।।

श्री गुरुदेव दत्त
स्वामी समर्थ