Showing posts with label Maitri. Show all posts
Showing posts with label Maitri. Show all posts

Sunday, August 02, 2020

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेछा

या जागतिक महामारी मध्ये हे खूप महत्त्वाचे आहे. 

सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेछा ! 

मैत्री दिन

#मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #मराठीकविताब्लॉग 


Sunday, August 04, 2019

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट...

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!



दोस्त म्हणजे...

दोस्त म्हणजे... 

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Tuesday, March 27, 2018

रेशमी बंध मैत्रीचे

रक्ताची नाती जन्माने मिळतात.

मानलेली नाती मनाने जुळतात.

पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,

त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.


Monday, October 17, 2016

Bhandan... भांडण...


भांडण

चंद्राचे नि माझे एकदा लागले भांडण..
भलताच भावनिक मुद्दा आणि भलतंच अवघड प्रकरण..

बाह्या सरसावून भांडू लागलो आम्ही एकेकाळचे दोस्तं..
भांडणाचं कारण एवढंच कि "त्याचं प्रेम श्रेष्ठ कि माझं प्रेम श्रेष्ठं...."

चंद्र म्हणे, "बघ मी आणि रात्र कसे भेटतो..?
आमच्या नुसत्या चाहुलीने सारा आसमंत कसा पेटतो..?

अश्या उसळतात लाटा आणि बेभान होतो समुद्र...."
बोलता बोलताच अजून उत्कटतेनं सांडू लागला चंद्र..

ऐक म्हणे, "आम्ही भेटताच होतं तारांगण लुप्त..
उरतो फक्त शुक्र, जो आधीपासूनच विरक्त आणि अलिप्त..

सारी सृष्टी गाऊ लागते मग आमचंच गुणगान..
मग मीही भरभरून देऊ लागतो त्यांच्या झोळीत चांदणदान..

सांग... हे असलं काहीतरी आहे का रे तुझं...?
सदानकदा तुझ्या डोळ्यांवर स्वप्नांचंच रे ओझं..

मग ती भेटो वा ना भेटो .. ओझी काही उतरली नाही..
आणि तुझी गाडीही पुढे काही सरकली नाही..

आठवतंय..? त्या रात्री खूप पाउस पडला होता बघ..!
तुला नव्हती सोसवत माझ्या चांदण्याची धग..

विनवत होतास मला, "जरा चांदणं आवरून घे..
आणि आता मला खरंखुरं उन दे..."

इथं मग होऊ लागली माझी गोची मात्र..
इतक्यात सोडून चालली त्याला त्याची रात्र..

कावरा बावरा होऊन त्याचे थरथरु लागले पाय..
म्हणालो मीही मिश्किलपणे "ओ चंद्रराव ... काय चाललंय काय..?"

रात्रीचे जसे जसे बदलू लागले रंग..
जरा फिके होऊ लागले चंद्राचेही अंग..

सूर्यबिंब जागं होऊन लागलं आभाळावर पसरू...
तो तो इकडे चंद्राच्या डोळ्यात जमू लागले अश्रू..

मग मीच म्हणालो त्याला जवळ घेऊन थोपटत त्याची पाठ..
"तुझी आणि माझी थोडीशीच वेगळी आहे वाट..

दोघांच्याही नशिबात पूर्ण सुख नाही.
आणि त्यात दोघांचीही काहीच चूक नाही.

आमच्यात जन्माचा दुरावा, व्यर्थ गेले सारे नवस
तुझ्या आणि रात्रीच्या आड आहे फक्त दिवस...

आता माझ्या डोळ्यातूनच अधूनमधून ती गळते रे.
दिवस सरला कि पुन्हा तुला रात्र मिळते रे..

युगानुयुगे चालूये हे, विनासायास.. विनाकष्ट..
घेतोय माघार मी, मान्यंय तुझंच प्रेम श्रेष्ठ.."

दिसू लागली त्याच्या डोळ्यात जरा पश्चात्तापाची झाक..
पाठ फिरवून मी चालू लागताच त्यानं दिली मला हाक..

"जाऊ नकोस रे माझ्यावर, नाराज होऊन असा..
माझ्या अंगा-अंगावर तुझ्याच कवितेचा रे ठसा..

झालो होतो मी कृतघ्न, झालो होतो पापी..
खरच माफ कर, मनापासून मागतो मी माफी..

तू होतास म्हणून तर मला मिळालं महत्व..
तूच तर जाणलंस माझ्यातलं काव्यतत्व..

नहितर होऊन राहिलो असतो मी दगड अंतराळातला..
कुणी केली असती माझी फुलांसोबत तुला..??

मी तुझी खपली अशी काढायला नको होती..
माझ्याकडून अशी आगळीक घडायला नको होती..

ती गेल्यावर, हक्कानं ठेवली होतीस तू मान माझ्या खांद्यावर..
श्रावणालाही लाजवणारी बरसली होती तेंव्हा सर..

किती काळ लोटलाय पण सर तश्शीच बरसतिये संततधार..
मलाच लाज वाटतीये आता, राजा मीच मानतोय माझी हार..

ती नाहीये तुझ्यासोबत पण तू नाहीयेस विसरत तिला...
मीच जातो कि रे सोडून पंधरा दिवस माझ्या रात्रीला.."

बोलता बोलताच कंठ दाटून चंद्र रडू लागला ढसाढसा..
पुन्हा एकदा त्याच्यावर उमटला माझ्या कवितेचा ठसा..

तेंव्हाच आम्ही दोघांनी घेतली शप्पथ, केला पण..
विसरून जायचं, दोघांमध्ये झालं होतं 'भांडण'..

आता हल्ली चंद्र जरा जास्तच समजून उमजून वागतो..
आणि मीही हल्ली लवकरच झोपतो.......... क्वचितच जागतो..

-चेतन दीक्षित

Monday, January 04, 2016

'मैत्री तुटायला कधी सुरुवात होते.....?'

'मैत्री तुटायला कधी सुरुवात होते.....?''

आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा .
मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा .
आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा .
मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत हे समोरच्याला सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा .

मित्र असे का वागला हे त्याला न विचारता आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा .
आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा .
मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा .

भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे असे आपण ठरवतो तेव्हा .
मित्र श्रीमंत झाल्यावर आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा .
आपला मित्र आता बदलत चालला आहे अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा .

मित्र बिझी असेल, त्यालाही त्याच्या अडचणी असतील हे आपण विसरायला लागतो तेव्हा .
आपल्या मित्राची आपण चार-चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा .
आपण जसा विचार करतो तश्याच विचाराने मित्राने वागले पाहिजे असा दुराग्रह बनतो तेव्हा .

आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे हे लोकांना सांगायला हवे अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा .
खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा .

कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा .
आपले मित्रांशिवाय काही अडत नाही हे आपण नकळत मित्राला दर्शवायला लागतो तेव्हा .
आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा .

मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा .

खर तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते , तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात .
असे असेल ,तसे झाले असेल ...असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो .

मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.
पण कुठेतरी गैरसमज , अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते .

''चांगली मैत्री बनायला
अनेक काळ जावा लागतो
पण मैत्रीमधील धागे तुटायला
एका क्षणाचाही वेळ लागत नाही ''
तेव्हा मित्रांनो ,

तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा .
आणि
तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका —


आपलाच एक मित्र...!!

Wednesday, October 28, 2015

ती म्हणजे मैञी असते...

जिथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला
हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला
आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते...

Tuesday, August 04, 2015

‎मैत्री‬ आणि प्रेम‬

आपल्या ब्लॉग चे वाचक विद्याधन एकडे यांची कविता ~ ‪#‎मैत्री‬ आणि ‪#‎प्रेम‬
 

Sunday, August 02, 2015

HAPPY FRIENDSHIP DAY...

परिचयातुन जुळते ती मैत्री,
विश्वासाने जपते ती मैत्री,
सुखात साथ मागते ती मैत्री,
आणि दुःखात साथ देते ती मैत्री,
चुकावर रागवते ती मैत्री,
यशावर सुखावते ती मैत्री,
पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री,
डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री,
आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री..!!!
HAPPY FRIENDSHIP DAY...

दिनाच्या माझ्या सर्व मित्र-मैत्रीणीना हार्दिक शुभेच्छा ....

दिनाच्या माझ्या सर्व मित्र-मैत्रीणीना हार्दिक शुभेच्छा ....

Friday, July 10, 2015

मैत्री म्हणजे काय?

मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे प्रेम
प्रेमानं प्रेमावर साधलेला अचूक नेम


मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री नाते खास
आनंद, जिव्हाळ्याचा तो एक घास सुग्रास

मैत्री म्हणजे कोणत्याही नात्यापेक्षा मोठे
मैत्रीशिवाय मित्राने जावे तरी कोठे

मैत्री म्हणजे अधिकार, मैत्री म्हणजे हक्क
अतुट असते नाते असते बंधन पक्कं

मैत्री म्हणजे माझा आवडता विषय आहे
मैत्री विषय आहे म्हटल्यावर बोलणे भाग आहे

मैत्रीचा हात म्हणजे खात्रीची ठेव
मैत्री अतूट असताना का वाटावे भेव

आईशी सुध्दा असु शकते मैत्री, असु शकते सुध्दा वडिलांशी
बंधन कुठे असते नात्याचे मैत्रीपाशी

मनोमेघ

Tuesday, February 24, 2015

Monday, September 29, 2014