Showing posts with label Itar Kavita. Show all posts
Showing posts with label Itar Kavita. Show all posts

Monday, October 19, 2015

साडीचा "पदर" !
काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी
नाही, अनुस्वार नाही. एक
सरळ तीन अक्षरी शब्द. पण,
केवढं विश्‍व सामावलेलं आहे
त्यात!
किती अर्थ, किती महत्त्व...
काय आहे हा पदर?
साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या
खांद्यावर रुळणारा मीटर दीड
मीटर लांबीचा भाग. तो
स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं
हे कामच त्याचं. पण, आणखी
ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा !
या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.
सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये
चर्चाही तीच.
लहान मूल आणि आईचा पदर,
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन
करण्याचा हक्क बजावतं.
जरा मोठं झालं, वरण-भात
खाऊ लागलं, की त्याचं
तोंड पुसायला आई पटकन
तिचा पदरच पुढं करते.
मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं
चालताना आईच्या पदराचाच
आधार लागतो. एवढंच काय,
जेवण झाल्यावर हात धुतला,
की टॉवेलऐवजी आईचा
पदरच शोधतं आणि आईलाही
या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात
मुलानं पदराला नाक जरी
पुसलं, तरी ती रागावत नाही
त्याला...
बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.
महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या
वरून मागे सोडला जातो;
तर गुजरात, मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून पुढं
मोराच्या पिसाऱ्यासारखा
फुलतो !
काही कुटुंबात मोठ्या
माणसांचा मान राखण्यासाठी
सुना पदरानं चेहरा झाकून
घेतात, तर काही जणी आपला
लटका, राग दर्शवण्यासाठी
मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !
सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं
वाण लुटायचं ते पदर लावूनच.
बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच
डोक्‍यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब
मिळते!
काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची
गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबत
बांधली जाते.
पदर हा शब्द किती अर्थांनी
वापरला जातो ना?
नवी नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते, पण
कामाचा धबडगा दिसला,
की पदर खोचून कामाला
लागते.
देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या
चुका "पदरात घे.‘
मुलगी मोठी झाली, की आई
तिला साडी नेसायला शिकवते,
पदर सावरायला शिकवते अन्‌
काय म्हणते अगं, चालताना
तू पडलीस तरी चालेल.
पण, "पदर" पडू देऊ नकोस ! अशी आपली संस्कृती.
या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.
पदर सुटला म्हटले, की
फजिती झाली; कुणी पदर
ओढला म्हटलं, की छेड
काढली.
"पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, आई मला नेसव
शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.
असा हा किमयागार साडीचा पदर आजकाल जिन्सच्या जमान्यात लुप्त होत चालला आहे . नाहीतर पुढील पिढीला त्याचा अर्थ सांगायला तुम्हाला आम्हाला नक्कीच डिक्शनरी काढावी लागणार हे देखील एक कटू सत्य आहे

Tuesday, May 27, 2014

आंब्याची लज्जत न्यारी....

हापूस आंब्याची लज्जत न्यारी
एकदाच खाल्ला पण किमतीला भारी......१

पायरी आंबा गोडच गोड
खावी त्याची निदान एक तरी फोड......२

नावाने जरी आंबा लंगडा
तरी तब्येतीने आहे चांगलाच तगडा....३

कच्च्या आंब्याचा नखराच भारी
लोणचे त्याचे घरोघरी....४

दशेरी आंब्याला नाही तोड़
रस त्याचा भारीच गोड....५

बेगमपल्लिने केली सर्वांवर ताण
गरीबाच्या घरी त्याचाच मान...६

चवीला पाणचट आंबा तोतापुरी
एकदाच खाला अन म्हणाल दहादा सॉरी...७

वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मान
त्याविना अपुरे सुवासिनिचे वाण....८

संपला आंब्याचा मोसम जरी
नीलम दिसतो घरोघरी......९

आंब्याच्या रसाला पंचपक्वान्नाचा मान
चांदीच्या वाटीत त्याचे स्थान....१०

आंब्याच्या फळाला राजाचा मान
सगळी फळे करती त्यालाच सलाम....११


आंब्याच्या आहेत हजारो जाती
कोकीळ पक्षी त्याचेच गुण गाती ....१२

संपले आमचे आंब्याचे गाणे
पण त्याआधी घ्या थंडगार पन्हे....१३

Friday, May 16, 2014

मोदी नावाच्या वादळात काँग्रेसचा धुव्वा ! अब की बार मोदी सरकार !!!

मोदी नावाच्या वादळात काँग्रेसचा धुव्वा !
अब की बार मोदी सरकार !!!
नमो नमो !!!


Thursday, April 10, 2014

'निर्भयपणे मतदान करा...

'निर्भयपणे मतदान करा...
घरात बसून सुट्टी साजरी करू नका.
साद घाला विकासाला..
लोकसभा २०१४ | आज 10 एप्रिल महाराष्ट्रात या ठिकाणी मतदान आहे|
बूलढाणा, अकोला, वर्धा, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा-गोंदिया

Wednesday, April 09, 2014

लोकशाही…२०१४

लोकशाही…२०१४
ना ’शरदा’चे चांदणे
ना ’सोनिया’चा दिस
’घड्याळा’चे ओझे ’हाता’ला
म्हणून ’आय्‌’ कासावीस!
’कमळा’च्या पाकळ्यांची
’यादवी’ छ्ळते मनाला
’धनुष्य’ आलयं मोडकळीस
पण जाणीव नाही ’बाणा’ला!
’विळा, हातोडा’ आणि ’कंदीला’ला
आजच्या युगात स्थान नाही
डब्यांना ओढू शकेल एवढी
’इंजिना’त जान नाही!
’मन’ आहे ’मुलायम’
पण ’माया’ कुठेच दिसत नाही
’हत्ती’वरून फिरणारा
’सायकल’वर बसत नाही!
कितीही उघडी ठेवा ’कवाडे’
’प्रकाश’ आत जाणार नाही
विसरलेले ’आठवले’ तरीही
’गवई’ गीत गाणार नाही!
’बंडखोर पक्षां’चा थवा
’पार्टी’साठी आतूर
कुंपणच खातय शेताला
आणि बुजगावणंही फितूर!

Tuesday, November 26, 2013

२६-११- भावपुर्ण श्रद्धांजली ...

सौभाग्यावतीचा कुंकू जेथे
रात्रीअपरात्रीही पुसला जातो
आमच्याच घरात आम्ही आता
पोरके झाल्याचा भास होतो !

मुंबईवरील हल्ल्याला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.
२६-११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक, शहीद झालेले पोलीस आणि जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली ...
जय हिंद!
 जय महाराष्ट्र !

Thursday, September 12, 2013

Thursday, August 13, 2009

Swine Flu...स्वाईन फ्लू ...

बरा होतो ‘स्वाइन फ्लू’!

वेळीच उपचार केल्यास ‘ स्वाइन फ्लू ’ बरा होतो. मात्र त्यासाठी लक्षणे आढळल्यावर तातडीने जवळच्या ‘ स्वाइन फ्लू ’ उपचार केंद्रावर जाणे आवश्यक आहे.