Showing posts with label Nav Varsh. Show all posts
Showing posts with label Nav Varsh. Show all posts

Monday, January 01, 2018

“येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.” 💐🙏🏽💐

“येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
Nav Varsh,Din Nutanvarsha Abhinandan


Thursday, December 31, 2015

" सरणारे वर्ष मी "

" सरणारे वर्ष मी "
-----------

मी उद्या असणार नाही
असेल कोणी दूसरे
मित्रहो सदैव राहो
चेहरे तुमचे हासरे

झाले असेल चांगले
किंवा काही वाईटही
मी माझे काम केले
नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानु
तुमची माझी नाळ आहे
भले होओ , बुरे होओ
मी फक्त " काळ " आहे

उपकारही नका मानु
आणि दोषही नका देऊ
निरोप माझा घेताना
गेट पर्यन्त ही नका येऊ

उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली
विसरु नका ' एक वर्ष '
साथ होती आपली

धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला
तुम्ही मला खुशाल विसरा
दोष माझा प्राक्तनाला

शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही
मी माझे काम केले
बाकी दूसरे काही नाही

निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणणार नाही
" वचन " हे कसे देऊ
जे मी पाळणार नाही

मी कोण ? सांगतो
" शुभ आशीष " देऊ द्या
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या।