Showing posts with label Tu. Show all posts
Showing posts with label Tu. Show all posts

Saturday, January 06, 2018

विरहाचा सहवास पुन्हा ... -मिलिंद जोशी

माझा अडला श्वास पुन्हा
तू असल्याचा भास. पुन्हा

मूर्तिमत सौन्दर्याला 
लज्जेची आरास पुन्हा ...

एकच क्षणता भेटीचा 
उरला तासतास पुन्हा ...

सुखास भेटायासाठी
दुःखा तू आलास पुन्हा ...

इथे सोबतीला उरला
विरहाचा सहवास पुन्हा ...

-मिलिंद जोशी
Punha - Milind Joshi
Punha - Milind Joshi


Tuesday, October 10, 2017

एक आशा... तु पुन्हा भेटण्याची.

एक आशा... तु पुन्हा भेटण्याची.

तु कवीता आहेस माझी
शब्दात, अर्थात
अन ओळींमध्ये तुलाच बघतो मी
पण तु येतेस
आणि लगेच निघुन जातेस
अगदी एखाद्या चारोळी सारखी

अन मग मी बसतो.
तुझ्या आठवणी रंगवत.
तुझ्या थोड्याश्या अस्तित्वाने ही
भारवुन गेलेल्या पाना फ़ुलांवर कवीता करत ..

आणि वाट पहात राहतो की, पुन्हा कधीतरी
भाव डोळ्यातील उलगडतील
स्पर्शातून, गाण्यातून वा एखाद्या कवितेतून ।
ते तुझ्या अस्तित्वाचे पुरावे आहेत;

आणि मांडतोय हा प्रपंच निदान ह्या आशेवरून ।

-- मंदार (साद मनाची)
Ek Aasha Tu Punha Bhetnyachi


Thursday, January 14, 2016

तरी भासते मला ती जगावेगळी

तरी भासते मला ती जगावेगळी

ओझं

फुलाच्या पाकळीला
थेंबाचं ओझं
मी तुझ्याकडे पाहिलं की
तसं होतं तुझं....
~ चंद्रशेखर गोखले 

Tuesday, December 01, 2015

तू असतीस तर

तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे

बकुळिच्या पुष्पांपरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन्‌ रंगांनी भरले असते
क्षितिजावरले खिन्‍न रितेपण

पसरियली असती छायांनी
चरणतळी मृदुश्यामल मखमल
अन्‌ शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसून मिष्किल

तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धूसर अंतर

मंगेश पाडगावकर

Wednesday, November 11, 2015

तू गेल्यावर वाटतं
खूपसं सांगायचं होतं,
तू खूपसं दिलंस तरी
आणखीन मागायचं होतं..
चंद्रशेखरजी गोखले

Monday, November 09, 2015

गारवा

गारवा हवेतला
रसिक होऊ लागला
साजणा अशा क्षणी
तू हवा, तू हवा

नभ हलके उतरती
कानी हळूच कुजबुजती
हात हाती गुंफ़िण्या
तू हवा, तू हवा

झुळूक मंद हासली
प्रीत मनी बहरली
मुग्ध मिठी पांघरण्या
तू हवा, तू हवा

वारा बघ जुल्मी हा
छेडितो पुन्हा पुन्हा
स्वैर बटा आवरण्या
तू हवा, तू हवा

भुरभुरत्या पावसात
भिजले मी नखशिखान्त
पदर जरा सावरण्या
तू हवा, तू हवा

जयश्री अंबासकर

Monday, October 26, 2015

अशी सावळी आहेस

अशी सावळी आहेस

हृदयामध्ये ठसावी, अशी सावळी आहेस
रणरण शांत व्हावी, अशी सावळी आहेस

सावळ्या रंगांमधेही, कितीकिती तरी छटा
त्यातही उठून यावी, अशी सावळी आहेस

गोड सहज सोज्वळ, तुझ्या रंगाचाया बाज
जिथे थबकेल कवी, अशी सावळी आहेस

स्वप्नामधून पाहिली, किती तरी तरूणांनी
जीवनात तीच हवी, अशी सावळी आहेस

तुष्की एकटाच नाही, तुझ्या रंगावर फिदा
देव यक्ष आस लावी, अशी सावळी आहेस

~ तुष्की नागपुरी
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, ०७:५०

Thursday, August 20, 2015

तु म्हणजे एक स्वप्न

तु म्हणजे एक स्वप्न,भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे,मनात दडुन ठेवलेले,
कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे

Monday, July 20, 2015

आपण प्रथम भेटलो तेथे

आपण प्रथम भेटलो तेथे
मन माझं पुन्हा पुन्हा फिरून जातं
सा-या खुणा तशाच असतात
तुझं असणं मात्र बाकी रहातं ...



Friday, March 13, 2015

माझी नेहमीची सवय...

माझी नेहमीची सवय
आरशात प्रतिबिंब पहायच
अन् पाहता पाहता
तुझ्या आठवणीत विरघळायच
#MarathiKavitaBlog

 

Tuesday, January 27, 2015

तुझे येणे तुझे जाणे

तुझे येणे तुझे जाणे
असच ते वळून पहाणे
आवडते ग मला तुझे
चोरून छुपून मला बघून जाणे ....
#MarathiKavitaBlog

Tuesday, December 09, 2014

Friday, December 05, 2014

माझ्या आयुष्याचे तसे दोन भाग पडतात...

माझ्या आयुष्याचे तसे दोन भाग पडतात
एक तू दिसायच्या आधी दुसरा तुला पाहिल्यानंतर
आणि तसं पाहिलं तर दोघात...
फक्त एका क्षणाचं अंतर
~ चंद्रशेखर गोखले 

#MarathiKavitaBlog

Friday, November 21, 2014