Showing posts with label Guru Poornima. Show all posts
Showing posts with label Guru Poornima. Show all posts

Sunday, July 21, 2024

गुरु कृपा म्हणजे काय?

गुरु कृपा म्हणजे काय?

पैसा, गाडी, बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे...

आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे  गुरुकृपा..!!

गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतोते सावरणे म्हणजे   गुरुकृपा..!!

एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळच पोटभर जेवण म्हणजे  गुरुकृपा..!!

कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, ती ताकद म्हणजे  गुरुकृपा..!!

'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे  गुरुकृपा..!!

अडचणीमध्ये सर्वजण साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे  गुरुकृपा..!!

प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर राहणे म्हणजे  गुरुकृपा..!!

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हेते नसताना आयुष्यात असलेले 'समाधान ' म्हणजे  गुरुकृपा.

Sunday, July 05, 2020

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

तूच ब्रम्हा, विष्णु, महेश, तूच दैवत एक,
करिता एक तुज वंदन पावे तिन्ही लोक.
तूच ज्ञानसागर, कैवल्याचा पुतळा तूची,
प्रगटला या भू तला तारण्या भक्तासी.
तुझीया चरणी जो जाई शरण,
होई त्याला दुःखाचे विस्मरण.
करिता तुझी प्रेमाने आळवण,
नित्य होई ज्ञानामृत रसपान.
तुझा महिमा अगाध अपरंपार,
आम्ही पामर तूच आम्हासी तार.
करुनी वंदन भक्तवत्सल गुरुरायाला,
आज करू साजरा गुरुपौर्णिमा सोहळा🙏🌺

प्रांजली लेले



Tuesday, July 16, 2019

गुरु हा संतकूळीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

गुरु हा संतकूळीचा राजा 
गुरु हा प्राणविसावा माझा 

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 



Friday, July 31, 2015

गुरु‬ ~ गुरुपोर्णिमा‬ च्या हार्दिक शुभेच्छा ||

#‎गुरु‬
गुरु भक्तांची माऊली
तप्त उन्हात ती सावली
अनुग्रहे करतात पावन
धरावे तयांचे चरण 


संकटात तारुनी नेतात
दासावरी पाखर घालतात
सुखकर्ता दु:खहर्ता
तोची सर्व कर्ता करविता

अशांती घालवून टाकी
गुरू माझा माझी लाज राखी
"स्मरण" ठेवुन जो स्मरण करी
तो त्यासीच उद्धरी

शब्दांची रत्ने ओसंडती
नुरे सहवासाने
भिती सत्संग करुनी सांगे सार
देई सदा सद्विचार

प्रारब्ध जरी दृढतर
करी सद्गुरु सकळ दूर
ऎशा सांगे गुजगोष्टी
सुखी होती दिन कष्टी

-मनोम

Tuesday, July 03, 2012

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Pornima...गुरुपोर्णिमा...

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वरः l
गुरु: साक्षात् परब्रम्ह
तस्मै श्रीगुरुवे नमः

Friday, July 15, 2011

Guru Purnima... गुरुपौर्णिमा....

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः|
गुरुपौर्णिमा निमित्ताने  मराठी कविता ब्लोग ची वाचकांना  हार्दिक शुभेच्छा!!