Showing posts with label Sundari. Show all posts
Showing posts with label Sundari. Show all posts

Wednesday, December 02, 2020

हळूच उमलते ओठांची नाजूकशी ती कळी....

हळूच उमलते ओठांची नाजूकशी ती कळी
 गालावर पडते तिच्या सुंदरशी एक खळी |
मोहून टाकते नजरेस माझ्या ती दिसते ज्या ज्या वेळी
 हृदयातून उमटते तेव्हा सुंदरशी एक चारोळी ||



Friday, June 05, 2020

श्रद्धा म्हण वा परंपरा म्हण...

श्रद्धा म्हण वा परंपरा म्हण
सावित्रीचा वसा खरा म्हण

समर्पित जी मनापासूनी
तू प्रेमाचा..तिला झर म्हण

कशीही असो..दिसायला पण
स्वर्ग सुंदरी अप्सरा म्हण

धुंद मोगरा जीवनात
तू आवडतो मज हा नखरा म्हण

घरटे सारे उजळवणारा
कोहिनूर तू एक हीरा म्हण

सौ. दिपाली कुलकर्णी 



Thursday, January 11, 2018

मराठमोळे तुझे सावळे

मराठमोळे तुझे सावळे रूप किती जरतारी
दागिन्यास येतेय तुझ्या त्या हसण्यानेच उभारी
.
ओठ पाकळ्या तांबुस गालांवर हा खळीचा भास
केसांचे हे झुळझुळ रेशिम पसरे मंद सुवास
तुला पाहता भक्त विठूचा विसरून गेला वारी
दागिन्यास येतेय तुझ्या त्या हसण्यानेच उभारी
.
टपोर डोळे पाहून त्यांना हृदयी जादू होता
किती कवींनी केल्या असतील कविता येता जाता
तुला पाहण्या चंद्र सूर्य पण येती तुझिया दारी
दागिन्यास येतेय तुझ्या त्या हसण्यानेच उभारी
.
~ तुष्की
Marathmole Roop - Tushki Nagpuri

Marathmole Roop - Tushki Nagpuri


Monday, June 13, 2016

डोळे भरून आले की..

डोळे भरून आले की..
तुझं रूप कसं दिसायला लागतं
छे! ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी
हलक्या हातानी कोणी पुसायला लागतं

- चंद्रशेखर गोखले

Thursday, January 14, 2016

तरी भासते मला ती जगावेगळी

तरी भासते मला ती जगावेगळी

ओझं

फुलाच्या पाकळीला
थेंबाचं ओझं
मी तुझ्याकडे पाहिलं की
तसं होतं तुझं....
~ चंद्रशेखर गोखले 

Wednesday, December 23, 2015

सुंदर खळी

कधी खट्याळ हसताना तु,
गालावर सुंदर खळी
पडायची…
अन् पडलेल्या त्या खळीमुळे,
तु अजून सुंदर दिसायची…

Wednesday, October 28, 2015

तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या गालावरच्या खळीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या ओठावरच्या स्मित हास्याने
तुझे गुपित मजला सांगितले
तुझ्या काळ्या कुंतल केसांनी
मज वेड कसे लाविले
तुझ्या भुरभुरणार्या बटांनी
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या झुळझुळीत गुलाबी साडीने
मज वेड कसे लाविले
वार्यासंगे फडफडणार्या पदराने
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या ठुमकत मुरडत चालीने
मज वेड कसे लाविले
तुझ्या थिरकत्या पैंजणानी
तुझे गुपित मजला सांगितले

तुझ्या घायाळ करत्या नजरेने
मज वेड कसे लाविले
तुझ्या धुंद अशा मिठीने
तुझे प्रेम मजला सांगितले

सौ मनिषा पटवर्धन

Monday, October 26, 2015

अशी सावळी आहेस

अशी सावळी आहेस

हृदयामध्ये ठसावी, अशी सावळी आहेस
रणरण शांत व्हावी, अशी सावळी आहेस

सावळ्या रंगांमधेही, कितीकिती तरी छटा
त्यातही उठून यावी, अशी सावळी आहेस

गोड सहज सोज्वळ, तुझ्या रंगाचाया बाज
जिथे थबकेल कवी, अशी सावळी आहेस

स्वप्नामधून पाहिली, किती तरी तरूणांनी
जीवनात तीच हवी, अशी सावळी आहेस

तुष्की एकटाच नाही, तुझ्या रंगावर फिदा
देव यक्ष आस लावी, अशी सावळी आहेस

~ तुष्की नागपुरी
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, ०७:५०

Tuesday, August 25, 2015

तुज बघता सारा हिशेब चुकला होता

"तुझ्यावरच्या कविता" मधील एक अप्रतिम रचना

तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता

तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता

तालात नादली तुझी पैंजणे तिकडे
हृदयाचा ठोका इकडे हुकला होता

डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता

निथळता चांदणे असह्य अंगावरती
मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता

तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता

पाहिले जयाने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता

चढणार होते जहर तुला हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता

संदीप खरे

Thursday, July 30, 2015

फुलराणी......

फुलराणी......

तिच्या गो-यापान हातावर
मेंदी कशी खुलून यायची
त्यात ती येताना ओठांवर
जास्वंद चुरडून यायची

ती हसताना प्राजक्तं सांडायची,
अंगभर चाफा लावून यायची
बोलताना ओठ मुडपायची, इकडे
माझ्या कानाची पाळी लाल व्हायची

काळ्याभोर शेपट्यावर कधी मोगरा,
कधी अबोली माळून यायची
मंद वारा जरी स्पर्शला तिला
तरी ती अत्तराची कुपी होउन जायची

चुकून किंवा मुद्दाम, जरा झाला स्पर्श,
ती लाजाळूचं झाड व्हायची
तिचे मेंदीचे हात हातात घेतले की
ती माझी वेल व्हायची

 जयंत विद्वांस

Wednesday, July 22, 2015

लावणी

आपल्या मराठी कविता ब्लॉग च्या वाचक सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे यांची अतिशय सुंदर लावणी ! कृपया आपला अभिप्राय कळवा.

लावणी

राया माझा पदर सोडा लावून देते विडा
मागे मागे करू नका द्या हो कात केवडा

माझे रूपडं हो सोन बावनकशी
भरली उभारी हो भरली पेर जशी
नका सतावू जाऊ द्या ना
नुकतच सरली सोळा

पदर सावरते परी ढळतो कसा
केस आवरते तरी सुटतो कसा
तुम्हास बघते दारा आडून धीर करून गोळा

तुम्ही याव म्हणून रोज भिजते ऊशी
तुम्ही दिसलात की होते वेडी
पिशी तुमच्यासाठी सजते श्रृंगार करून सोळा

-- सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

Thursday, July 02, 2015

तुझ असे सजणे..

तुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे..
काबूत रहाव तुझ्या नेहमी..असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..

का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..
तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...


दंग होई कुणी असा तुझा साज..
मखमली गालाला नथनीचा बाज..

किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..
पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..

भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..
पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..

ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..
जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..

तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..
जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी..

त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..
अन क्षणात सारी धरणी हिरवीगार भिजून होत असावी.

Wednesday, May 20, 2015

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

– आरती प्रभू

Friday, January 23, 2015

तिने किती सुंदर दिसावं..

 तिने किती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं...

तिने किती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं
सोबत तिच्या...

तिने किती साधं रहावं
त्यातही रूप तिचं खुलावं
कोणीही फिदा व्हाव
अदांवर तिच्या...

तिचं उदास होणं
कसं हृदयाला भिडावं
कोणालाही वाईट वाटावं
अश्रूंनी तिच्या...

तिचं हसणं
कोणालाही सुखवावं
कोणीही घसरून पडावं
गालावरल्या खळीत तिच्या...

तिच्या नजरेने मलाच शोधावं
अचानक नजरेने नजरेला भिडावं
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं
लाजेने चूर चूर व्हावं...

ती समोर असताना
मी सारं काही विसरावं
तिने इश्य करत लाजावं
मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं...

तिने फक्त माझंच रहावं
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं
साथ देऊ जन्मोजन्मी
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

#MarathiKavitaBlog

Tuesday, October 21, 2014

तीन किती सुंदर दिसाव

तीन किती सुंदर दिसाव
जस गुलाबाच फूल उमलाव...
कोणाच्याही नजरेत भराव...
तासन् तास पाहताच रहाव...

#MarathiKavitaBlog