Showing posts with label Rakhshabandhan. Show all posts
Showing posts with label Rakhshabandhan. Show all posts

Thursday, August 15, 2019

Tuesday, August 20, 2013

रक्षाबंधनाच्या 'गोडगोड' शुभेच्छा!

' तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना'
असं एक खास नातं म्हणजे बहिण-भावाचं नातं.
या नात्यात खोड्या असतात, रुसवे फुगवे
असतात, तर कधी हाणामारीपर्यंत मजल
गेली असते. पण ही झाली नाण्याची एक बाजू
दुसरीकडे आई-बाबा रागावल्यानंतर
आपल्या जवळचं वाटणारं, आपल्याला समजून
घेणारं, जनरेशन गॅपमध्ये आपल्या पाठीशी ठाम
उभं राहणारं नातं असतं तेही बहिण भावाचं.
सुखदु:खाच्या प्रसंगात सगळ्यात जवळचं नातं
म्हणजे बहिण भावाचं. अशा निखळ
आणि नि:स्वार्थ प्रेमाची,
संबंधाची परंपरा कायम जपणारा कौटुंबिक सण
म्हणजे 'रक्षाबंधन'.
लहानपणापासून असणा-या या सणाचा उत्साह
कितीही मोठे झालो तरी कायम असतो. पण
अनेकदा भाऊ-बहिण कामाच्या तणावात
आणि धकाधकीच्या जीवनात
रक्षाबंधनाची सुटी काढून एकमेकांकडे पोहचू
शकत नाही. किंवा काही जण एकमेकांपासून खूप
लांब राहातात. पण
आपल्याला आजच्या दिवशी एकमेकांची आठवण
विशेष करून येत असते. त्यांच्याशी खूप बोलावं,
आपलं मनं मोकळं करावं असं ही वाटत असतं.
अशा आपल्या भावा-बहिणींना
आपल्या शुभेच्छा आणि मनोगत
प्रतिक्रिया स्वरुपात इतर
वाचकांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला खूप आनंद
होईल.
आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या 'गोडगोड'
शुभेच्छा!


Rakhshabandhan... रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा...

Rakhshabandhan Facebook Cover Photo
रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा...

Rakhshabandhan... रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा...

रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा

Thursday, August 02, 2012

Bandhan... बंधन...

♥ बंधन... ! ♥
तुझ्या माझ्या नात्यात चॉकलेटचा गोडवा असेल
प्रेमाचा रेशमी धागा माझ्या हातावर बांधला असेल
तुझ्याच सुखासाठी अंतरीचे दु:ख मी झाकलेले असेल
आयुष्यात सुखी रहावीस म्हणून देवाला पुजलेले असेल
तुझ्यावर येणार्‍या संकटात तुझी ढाल मी बनलो असेल
नात्यांच्या संरक्षणाचे बीज माझ्यात अंकुरले असेल
बहिणीच्या आभाळ मायेत मी क्षणभर गहिवरलो असेल
औक्षण करून घेऊन तुझ्याकडून, मी भरून पावलो असेल
♥ !...रेशमी बंधनाच्या रेशमी शुभेच्छा...! ♥
.
मृदुंग

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !