Showing posts with label Charolya. Show all posts
Showing posts with label Charolya. Show all posts

Friday, March 07, 2025

माझं माझ्या मनाशी ...

माझं माझ्या मनाशी ...

हल्ली वाद चालतो तुझ्यावरून

त्या बहाण्यानी तुझ्या बद्दल

आम्ही दोघे बोलून घेतो भरभरून.

- चंद्रशेखर गोखले

Chandrashekhar Gokhale,Charolya,


Friday, December 11, 2020

Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग

झोप येत नसेल तर... 
अुरलेली रात्र माझ्याकडे पाठव
प्रत्येक गोष्ट कशी आपण वाटून घेतो
हे जरा स्वता:शी आठव.
-चंद्रशेखर गोखले 
Chandrashekhar Gokhale


Wednesday, December 02, 2020

हळूच उमलते ओठांची नाजूकशी ती कळी....

हळूच उमलते ओठांची नाजूकशी ती कळी
 गालावर पडते तिच्या सुंदरशी एक खळी |
मोहून टाकते नजरेस माझ्या ती दिसते ज्या ज्या वेळी
 हृदयातून उमटते तेव्हा सुंदरशी एक चारोळी ||



Friday, September 18, 2020

Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग

तू माझ असणं
किती छान आहे,
नाहीतर हे जग म्हणजे
नुसता माणसांच रान आहे.

- #चंद्रशेखर_गोखले



Saturday, September 05, 2020

तुला आठवताना... चंद्रशेखर गोखले

तुला आठवताना एक
प्रश्न पडतो मनाला
इतकं स्पष्ट कधी काही
आठवतं का कुणाला...

- चंद्रशेखर गोखले



Sunday, June 07, 2020

भाव कोरोनाचे

भाव कोरोनाचे
आज पार कोसळले..
थेंब 'निसर्ग'चे
जेव्हा मातीत मिसळले
- विभावरी बिडवे



Friday, June 05, 2020

मी अजून ही रमतो ... - चंद्रशेखर गोखले

मी अजून ही रमतो
आपली शेवटची भेट आठवण्यात
काय आसुरी आनंद आहे कळत नाही
मधाचं पोळं उठवण्यात.
- चंद्रशेखर गोखले


Friday, May 29, 2020

जीवन जागाव ते गुलाबा कडून शिकाव...

प्रेमात कोण मन तोडत,
मैत्रीत कोण विश्वास तोडत,
जीवन जागाव ते गुलाबा कडून शिकाव,
जो स्वतः तुटून दोन मनांना एकत्र करत....



Monday, January 27, 2020

अनोळखी भेट - Anolkhi Bhet


आपल्या मराठी कविता ब्लॉग चे वाचक संकेत यांची चारोळी

कधी कशी झाली भेट
परकी जागा आपुली वेळ
वक्ता श्रोता गुंतला एवढा
घडली जेव्हा अनोळखी भेट

संकेत कुलकर्णी ( डोंबिवली )


Saturday, August 03, 2019

वाटसरू - चंद्रशेखर गोखले

वाटसरू - चंद्रशेखर गोखले 

निथळत राहणारा परीसर
माझ्या खिडकितून दिसतो
पण एकही वाटसरू
सुन्या रस्त्यावर नसतो.
- चंद्रशेखर गोखले


Tuesday, July 23, 2019

भेटण्या पेक्षाही

भेटण्या पेक्षाही
तू दिसण्याचा आनंद मोठा
त्यात माझा निर्वीकार असण्याचा
आव खोटा.. .
-चंद्रशेखर गोखले



Tuesday, July 16, 2019

पावसाचं एक गुपित

पावसाचं एक गुपित
सगळ्या ना नाही माहित
तो अक्षरांची ओंजळ टाकतो
प्रत्येक कविच्या वहीत...
- चंद्रशेखर गोखले


Sunday, May 19, 2019

गावातलं घर

ऐकलंय करोडोंच घर 
घेतलंय त्याने शहरात पण 
अंगण दाखवायला अजूनही 
मुलांना तो गावात आणतो


Saturday, May 18, 2019

माणूस

वरून मस्त टवटवीत 
तरी आतून तो कोमेजलेला.. 
कसा असतो ना माणूस 
माणसालाच न समजलेला.. 

©शब्द अनिकेत