Friday, March 25, 2016

पुरण पोळी आणि कटाची आमटी

आयुर्वेदात सांगितले  आहे की जिथे जिथे डाळी शिजवून वापरल्या जातात तिथे साजुक तूप नाजुकपणे वापरायचे नाही. म्हणजे सढळ हस्ते पोळीवर घ्यावे. म्हणजे डाळीने वाढणारे पित्त कमी होते.
पण तुपाने कोलेस्टरॉल वाढेल त्याचे काय ?
त्यासाठी आपण करतो कटाची आमटी. या आमटीतील काळा मसाला, कढीपत्ता, तमालपत्र इ. कोलेस्टरॉल कमी करते.

आहे होळी
खा पोळी
वाटी तुपाची
आमटी कटाची
नका करू काळजी
आरोग्याची.

वापरावे पाणी जपून जपून

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !…..

रणरणत्या उन्हात अनवाणी
कमरेवर घागर घेऊन
बालिका चालतेय भरभर
घर आहे अजून दूरवर

शाळेत शिकण्याचे वय
आणि निरागस मन
भाळी तिच्या आज असे
पाण्यासाठी वणवण

खिन्न झाले माझे मन
हे दृश्य पाहून
वापरावे पाणी जपून जपून
हाच संकल्प करुया आपण

- प्राची देशपांडे

Tuesday, March 15, 2016

कोरी पाटी...

कोरी पाटी...
लहान मुलांचं मन ,
म्हणजे कोरी पाटी,
आईच्या हातात खडू,
त्यावर लिहिण्यासाठी
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात,
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही वाटत नाही,
खरं बोलायचं भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग,
लावायची कोणाला लागली लाथ तर,
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवते सगळं,
जरी आता सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड व्हायच्या पापण्या अन
मिटायचे डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ वाटून खायचे सात.
आई घालायची वाट पाहतांना
कोपऱ्यात पालथा पेला,
एव्हढा भाबडा विश्वास हिने
कुठून पैदा केला?
आई म्हणायची,......,आई म्हणायची,
आता खडू माझ्या हाती,
होता येईल का मला
असं माझ्या चिमण्यासाठी??

Tuesday, March 08, 2016

जागतिक महिला दिन

आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त मनपुर्वक शुभॆच्छा....
महिला ही कधी लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवॆश करतॆ व ती आपल्या आयुष्यात नानाविध रूपात प्रकट होतॆ, ती अशी......
माय तु कुणाची, बहिण तु कुणाची..सासु तु कुणाची, तर सुन तु कुणाची....
वात्सल्य तुझ्यात, प्रॆम तुझ्यात..करूणा तुझ्यात, उदारता तुझ्यात....
या क्षितीजावरील लता तु, आशा तु शॆवंती तु अन् बकुळी तु...
जाईजुई तु , रातराणी तु, कुसुमॆ तु, सुमनॆ सुद्धा तु.....या सर्वांमधील दरवळणारा सुवास तु....
तु आहॆस तरी कुणाची, किती रूपांची, कुणालातरी उमजॆल का तु ?
मायॆचा पंख पसरूनी, या क्षितीजावरती आणलॆस तु , संसाराच्या वृक्षवॆलीवर बहरलॆल फुल तु....
कधी गंगा तु , कधी गोदावरी तु...कधी नर्मदा तु तर कधी कृष्णा तु....
इच्छा तु, जिद्द तु, आकांक्षा तु, अन् स्वप्नही तु....
कधी राधा तु, कधी मीरा तु...कधी पार्वती तु, तर कधी सरस्वती तु....
कधी मुक्ता तु, कधी अहिल्या तु..कधी सावित्री तु, तर कधी रमाई तु....
कधी लक्ष्मी तु, कधी इंदिरा तु, कधी जना तु...कधी बहिणा तु, तर कधी बदलत्या जगाबरोबर बदलणारी आधुनिक स्री तु....
कशाकशात सामावलीस तु , आई-वडील, पती, मुलॆ, नातॆवाईकांची दु:खॆ आपल्यात सामावुन घॆणारी प्रॆमळ स्री तु...
तु आहॆस तरी कुणाची, किती रूपांची, किती मोठ्या मनाची, कुणालातरी उमजॆल का तु......