Sunday, June 07, 2020

भाव कोरोनाचे

भाव कोरोनाचे
आज पार कोसळले..
थेंब 'निसर्ग'चे
जेव्हा मातीत मिसळले
- विभावरी बिडवे



Friday, June 05, 2020

श्रद्धा म्हण वा परंपरा म्हण...

श्रद्धा म्हण वा परंपरा म्हण
सावित्रीचा वसा खरा म्हण

समर्पित जी मनापासूनी
तू प्रेमाचा..तिला झर म्हण

कशीही असो..दिसायला पण
स्वर्ग सुंदरी अप्सरा म्हण

धुंद मोगरा जीवनात
तू आवडतो मज हा नखरा म्हण

घरटे सारे उजळवणारा
कोहिनूर तू एक हीरा म्हण

सौ. दिपाली कुलकर्णी 



मी अजून ही रमतो ... - चंद्रशेखर गोखले

मी अजून ही रमतो
आपली शेवटची भेट आठवण्यात
काय आसुरी आनंद आहे कळत नाही
मधाचं पोळं उठवण्यात.
- चंद्रशेखर गोखले


Thursday, June 04, 2020