Friday, July 17, 2020
टीव्ही वरची शाळा
१९९१ च्या किशोर मासिकात ही कविता सापडली. पुढे वीस वर्षात खरंच टीव्ही वरची शाळा येईल हे कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल! गंमत आहे नाही?
Sunday, July 05, 2020
गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा
तूच ब्रम्हा, विष्णु, महेश, तूच दैवत एक,
करिता एक तुज वंदन पावे तिन्ही लोक.
तूच ज्ञानसागर, कैवल्याचा पुतळा तूची,
प्रगटला या भू तला तारण्या भक्तासी.
तुझीया चरणी जो जाई शरण,
होई त्याला दुःखाचे विस्मरण.
करिता तुझी प्रेमाने आळवण,
नित्य होई ज्ञानामृत रसपान.
तुझा महिमा अगाध अपरंपार,
आम्ही पामर तूच आम्हासी तार.
करुनी वंदन भक्तवत्सल गुरुरायाला,
आज करू साजरा गुरुपौर्णिमा सोहळा

प्रांजली लेले
तूच ब्रम्हा, विष्णु, महेश, तूच दैवत एक,
करिता एक तुज वंदन पावे तिन्ही लोक.
तूच ज्ञानसागर, कैवल्याचा पुतळा तूची,
प्रगटला या भू तला तारण्या भक्तासी.
तुझीया चरणी जो जाई शरण,
होई त्याला दुःखाचे विस्मरण.
करिता तुझी प्रेमाने आळवण,
नित्य होई ज्ञानामृत रसपान.
तुझा महिमा अगाध अपरंपार,
आम्ही पामर तूच आम्हासी तार.
करुनी वंदन भक्तवत्सल गुरुरायाला,
आज करू साजरा गुरुपौर्णिमा सोहळा


प्रांजली लेले
Subscribe to:
Posts (Atom)