Wednesday, August 17, 2011

"लोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे?





"लोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे?

१. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा "लोकायुक्त" निवडला जाईल.

२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सारकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्तीत जास्त १ वर्ष आणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.

४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.

५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? ...

......आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्‍याकडून दंड वसूल केला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.

६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचे काम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोग जास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.

७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय!

८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही! या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्‍याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.

९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही... या सर्व यंत्रणा "लोकपाल" मध्ये समाविष्ट कार्यात येतील.

१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.

११.आणि सगळ्यात महत्वाचे... लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.

आज आपल्या देशाला "लोकपाल" ची नक्कीच गरज आहे... अण्णा हजारे यांना पाठिंबा द्या!!!
जय हिंद !!! जय महाराष्ट्र  !!!

Friday, July 15, 2011

Guru Purnima... गुरुपौर्णिमा....

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः|
गुरुपौर्णिमा निमित्ताने  मराठी कविता ब्लोग ची वाचकांना  हार्दिक शुभेच्छा!!

Thursday, July 14, 2011

बॉम्ब फुटतोय पुन्हा पुन्हा......

बॉम्ब फुटतोय पुन्हा पुन्हा......

नका उडवू झोप आमची, काय केला आम्ही गुन्हा
धर्मं जातीचे नाव घेउनी, बॉम्ब फोडतात पुन्हा पुन्हा.....

मास बिघरते रक्त सांडते, मरतात इथे निष्पाप जीव
आई वडीलान पासून मूल छिनते, पाहून येते त्यास कीव
डोळ्यांमधून अश्रु वाहता, दुखाने होतो व्याकुळ जीव
नेता येते पाहून जातो, जाहिर करतो पैसे पुन्हा.....

असो हिंदू असो मुसलमान, या धर्तीचे लेकरे आपण
धर्मं जातीचे नाव घेउनी, नेता साधतो आपली साधन
निष्पाप जनता आगीत लपटते, नेत्यास मिळते त्याचे आसन
नका लढू रे आपआपसात, आपल्याच हातून घडतोय गुन्हा.....

आई मरते बाप मरतो, पोरके होते मूल तान्हे
घर बनते स्मशान घाट, बिखरतात आयुष्याची सर्व पाने
या आगीत मरतात सारे, मरतात इथे हिंदू मुसलमाने
दहशतवाद्यास ठेचुन काढा, देऊ नका त्यास पन्हा.....

हवा बुद्ध हवा येशु, नको आम्हास रक्त पिशासु
शांत प्रिय देशास माझ्या, डोळ्यात येते रक्ताचे आसू
निरागस जनतेच्या चिंधड्या उड़ताच, दहशतवाद्यास येते हसू
असा हां भयानक राक्षस, बॉम्ब फोडतो पुन्हा पुन्हा.....

                             
        कमलेश प्रल्हाद गुंजाळ