Sunday, July 21, 2024

गुरु कृपा म्हणजे काय?

गुरु कृपा म्हणजे काय?

पैसा, गाडी, बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे...

आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे  गुरुकृपा..!!

गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतोते सावरणे म्हणजे   गुरुकृपा..!!

एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळच पोटभर जेवण म्हणजे  गुरुकृपा..!!

कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, ती ताकद म्हणजे  गुरुकृपा..!!

'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे  गुरुकृपा..!!

अडचणीमध्ये सर्वजण साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे  गुरुकृपा..!!

प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर राहणे म्हणजे  गुरुकृपा..!!

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हेते नसताना आयुष्यात असलेले 'समाधान ' म्हणजे  गुरुकृपा.

Saturday, December 12, 2020

Friday, December 11, 2020

Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग

झोप येत नसेल तर... 
अुरलेली रात्र माझ्याकडे पाठव
प्रत्येक गोष्ट कशी आपण वाटून घेतो
हे जरा स्वता:शी आठव.
-चंद्रशेखर गोखले 
Chandrashekhar Gokhale


Wednesday, December 09, 2020

Wednesday, December 02, 2020

हळूच उमलते ओठांची नाजूकशी ती कळी....

हळूच उमलते ओठांची नाजूकशी ती कळी
 गालावर पडते तिच्या सुंदरशी एक खळी |
मोहून टाकते नजरेस माझ्या ती दिसते ज्या ज्या वेळी
 हृदयातून उमटते तेव्हा सुंदरशी एक चारोळी ||



Saturday, November 14, 2020

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

*卐 शुभ दिपावली 卐* 🙏सस्नेह नमस्कार🙏
 दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! 
शुभ दिपावली


Friday, November 13, 2020

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो. 🚩धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🚩 



Friday, October 30, 2020

Friday, September 18, 2020

Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग

तू माझ असणं
किती छान आहे,
नाहीतर हे जग म्हणजे
नुसता माणसांच रान आहे.

#चंद्रशेखर_गोखले



Tuesday, September 15, 2020

बरंच काही.. स्पृहा जोशी

बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो..
सांडून जातो धुवांधार
आसुसलेलं, थबकलेलं
बरंच काही.
मोकळं मोकळं करून जातो..
पाऊस सांगत नाही
त्याच्या मनातलं यायच्या आधी,
पण आपल्या मनातलं
सारं काही शहाण्यासारखं समजून घेत
हवं तेव्हा, हवा तसा
आपल्यासाठीच भरून येतो..
निवळशंख पाणी
एक थेंब, दोन थेंब..
आभाळभर रांगच रांग;
पुन्हा थेंब, त्यात पाऊस..
नितळ नितळ करत जातो,
बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो..
#स्पृहा_जोशी
Spruha Joshi,Marathi Kavita,Paus Kavita,




Saturday, September 05, 2020

तुला आठवताना... चंद्रशेखर गोखले

तुला आठवताना एक
प्रश्न पडतो मनाला
इतकं स्पष्ट कधी काही
आठवतं का कुणाला...

- चंद्रशेखर गोखले