पैसा, गाडी, बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे...
आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा..!!
गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतोते सावरणे म्हणजे गुरुकृपा..!!
एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळच पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा..!!
कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, ती ताकद म्हणजे गुरुकृपा..!!
'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरुकृपा..!!
अडचणीमध्ये सर्वजण साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे गुरुकृपा..!!
प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर राहणे म्हणजे गुरुकृपा..!!
पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हेते नसताना आयुष्यात असलेले 'समाधान ' म्हणजे गुरुकृपा.
I read your blog and I really liked it. I have read another blog similar to this one, I liked the table very much click here
ReplyDeletehttps://www.kavitechepaan.com/?m=1
ReplyDeleteSundar
ReplyDelete