#MarathiKavitaBlog
Are Are Pavsa... अरे अरे पावसा...
अरे अरे पाऊसा !!!
किमान बरस तरी आज!
जून चालला उलटून
निदान बाळग थोडी लाज!
सृष्टीचाच नियम म्हणून
तुलाही घे लाच!
दोन पैसे जास्ती घेऊन
मोरांसाठी नाच!!
त्याचा सुद्धा तुझ्यावर
विश्वास नाही राहिला!
फुलोरा करून पिसांचा
डिजेवर नाचू लागला !
काय तुझा पूर्वीचा तो
होता कसा थाट
चातकं सुद्धा तुझी आता
पहात नाही वाट
तहानलेला कावळा आता
गोष्टीं मध्येच राहीला,
तुला वैतागुन शेवटी
बिसलरी पिऊ लागला!!
ढग घेऊन काळेकुट्ट
विजांसोबत गरज,
सवाल तुझ्या इमेजचा
आता तरी बरस !!!!
आता तरी बरस !!!
Are Are Pavsa... अरे अरे पावसा...
अरे अरे पाऊसा !!!
किमान बरस तरी आज!
जून चालला उलटून
निदान बाळग थोडी लाज!
सृष्टीचाच नियम म्हणून
तुलाही घे लाच!
दोन पैसे जास्ती घेऊन
मोरांसाठी नाच!!
त्याचा सुद्धा तुझ्यावर
विश्वास नाही राहिला!
फुलोरा करून पिसांचा
डिजेवर नाचू लागला !
काय तुझा पूर्वीचा तो
होता कसा थाट
चातकं सुद्धा तुझी आता
पहात नाही वाट
तहानलेला कावळा आता
गोष्टीं मध्येच राहीला,
तुला वैतागुन शेवटी
बिसलरी पिऊ लागला!!
ढग घेऊन काळेकुट्ट
विजांसोबत गरज,
सवाल तुझ्या इमेजचा
आता तरी बरस !!!!
आता तरी बरस !!!
No comments:
Post a Comment