Friday, September 18, 2015

"दुःख हर्ता "

"दुःख हर्ता "
का बाप्पा रुसला ह्या वर्षी
शेतकरी झाला दुःखी
पिक पाणी नाय हाती
कशे राहू आम्ही सुखी

तुझ्या आगमनाची तयारी
स्वागताची तयारी
केली खरी साऱ्यांनी
पण मन खचलंय कुठेतरी

तुझ्या भक्तीत काय कसर
आम्ही करणार नाय
आमच्या उदास मनाचा कोपरा
का तुला दिसत नाय

तुझ्यासाठी सगळे नियम
इकोफ्रेंडली मूर्ती वगैरे
विसर्जनाची आटोपशीर सोय
सारे काही आम्ही करू बरे

निरोप घेतांना मात्र बाप्पा
एक वचन दे भक्ती करांत
समतोल ठेव गरीब श्रीमंतात
खरे भक्त तुझे गरीबात असतात

- सुरेखा मालवणकर

No comments:

Post a Comment