Saturday, March 17, 2018

ओंजळ...

ओंजळ...

तुझ्या परिजातकाच्या फुलांनी
तू माझी ओंजळ भरलीस
आणि ओंजळीत भरून राहिलेल्या गंधान
तू मला चिंब भिजवलस ... तुझ्या प्रेमात
भिजले मी, भारले मी, मुग्ध मी,
माझ्यात ना उरले मी ... तुझ्या प्रेमात
सांग, कुठून शिकलास इतकं प्रेम करायला ?
- कृष्णाप्रिया
Marathi Prem Kavita,Prem, Onjhal


No comments:

Post a Comment