Wednesday, December 11, 2019

श्री दत्त जयंती

अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा||

श्री दत्त जयंती निमित्त आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा.
आपल्या कुटुंबातील सगळ्यांना भरभरून आयुष्य लाभो ,
 आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच श्री गुरुदत्त चरणी प्रार्थना ||


Thursday, November 21, 2019

"वडापाव" Vadapav

शरीराला डाएटिंग ची गरज असते तेव्हा आत्म्याला "वडापाव"ची गरज असते. शरीर हे नश्वर असून आत्मा अमर आहे. म्हणून मी आत्म्याचे ऐकतो.😌


Tuesday, October 29, 2019

भाऊबीजेच्या शुभेच्छा!

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!


Saturday, October 26, 2019

Tuesday, October 08, 2019

शुभ दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

खड्‌ग, चक्र, आणि हाती धनुष्यबाण, वाहन तुझे वाघ आई, दे शक्तीचे वरदान.

घटस्थापना व नवरात्र उत्सव निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 



Thursday, September 26, 2019

पाऊस दादा पाऊस दादा

आपल्या मराठी कविता ब्लॉग च्या वाचक
प्रतिभा येवले यांची कविता.
कशी वाटली नक्की कळवा.

पाऊस दादा पाऊस दादा
आता तरी जा की रे!
तुझे आई तुझे बाबा
वाट नाही का बघत रे!

वाट तुझी बघत होतो।
आम्ही किती वेड्यासारखी।।
आलास तेव्हा वाटले होते।
होतील तृप्त सर्व मनासारखी।।

बरसु लागला जेव्हा तु...
मुलं सारी बागडू लागली।
शेतं मळे सजु लागले।।
गुर ढोर शीतल झाली।
बळीराजा ही हरपुन गेला।।

तोच तुझा प्रकोप झाला।
सैरावैरा तु वाहु लागला।।
मनी ध्यानी नव्हते काही।
होते तेही राहीले नाही।।

कारे झालास स्वार्थी असा..?
कोण घेईल त्या गरिबांचा वसा..?
राहिला नाही जनावरांचा गोठा।
कहर केलास केवढा मोठा।।

'जारे जारे पाऊसा
तुला देतो पैसा'
'सांग सांग भोलानाथ
पाऊस जाईल का...?'
गाऊ लागली पोरं पोरी।
अश्रु त्यांचे पुसून भारी।।

जाशील जेव्हा घरी तुझ्या
विचार करशील कारे जरा..?
आलास जरी पुन्हा केव्हा।
जपुन येरे येशील जेव्हा।।

आहेस तु ह्या विश्वाचा पाठीराखा।
माझ्या बळीराजाचा अन्नदाता।।

✍️ प्रतिभा येवले 




Thursday, September 12, 2019

गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !

काही चुकलं असल
तर माफी असू द्या,
पण पुढच्या वर्षी
मात्र लवकर या...
गणपति बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या !



Thursday, September 05, 2019

*तो दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व जाणवतं..!*

कथेची मूळ लेखिका ॲडव्होकेट ऋचा मायी.

*तो दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व जाणवतं..!*

आज आई खूप रडत होती...
बाबांनी घरातले सगळे देव पिशवीत भरले होते आणि नदीत विसर्जन करायला निघाले होते..
आईचा देवावरचा प्रचंड विश्वास बाबांना खपायचाच नाही.माणसाचा स्वतःच्या मनगटावर विश्वास हवा हे त्यांचं ठाम मत.. ‘कमकुवत माणसं देवाच्या नादी लागतात आणि स्वतः कष्ट करत नाहीत’..... आणि आईचं तेच होत चाललं आहे ही त्यांची तक्रार होती. आता हे देव नकोच..

घरात काही चांगलं झालं की आईचं ठरलेलं वाक्य ‘देवाची कृपा’..! आता बाबांनी विडाच उचलला बघू हिचे देव स्वतःचं तरी रक्षण करू शकतात का?नदीत बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकतात का?

रागाच्या भरात त्यांनी देवघरातून सगळे देव उचलले आणि पिशवीत भरले.. भरकन गाडी काढली आणि एकटेच निघाले नदीच्या दिशेने...

इकडे रडून रडून आईचे डोळे अक्षरशः सुजले होते..

आज आईचं अजिबात ऐकत नव्हते बाबा आणि म्हणाले, “याद राख एकजरी देव विकत आणलास तर.. ”

आईला तर सुचतच नव्हते काय करावं. तिला वाटतं होतं निदान घरात राहूद द्यावे देव,हवं तर पुजा करणार नाही मी.. पण असे देव्हारा रिकामा करू नये शेवटी तिची शक्ती होती ती.

एरवी बाबा एकदम प्रेमळ माणूस.. पण देवावर अजिबात विश्वास नाही आणि त्यामुळे आईच आणि त्यांचं नेहमीच खटकायचं त्यावरून...

इतके दिवस निदान पूजा तरी करू द्यायचे पण कालपासून आई गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी करत होती आज अर्ध्या दिवसांनी बाजारातून सजावटीच्या , पूजेच्या तयारीसाठी सगळं घेऊन घरी आली. किती हा टाईमपास आहे असं वाटून तेवढ्या वेळात बाबांच्या रागाचा पारा चढलेला होता...

आईला फारच मोठा धक्का बसला....

आईला माहित होते काही दिवसांनी राग उतरल्यावर बाबांना त्यांची चूक समजेलही पण गणेशउत्सव संपल्यावर उपरती होऊन काय उपयोग?

खूप चलबिचल वाढली होती मनाची तिच्या..

देव असतो की नसतो ? ह्या विषयावर तिला बोलायचंच नव्हतं.. देवाची पूजा केल्यावर मनाला प्रसन्न वाटतं, आनंद मिळतो हा साधा सरळ हिशोब होता तिचा.परत बाबांनी देवाचं काहीही करावं अशी अपेक्षा कधीच केली नाही तिने. तिला साधी मनोभावे पूजा करायची असायची,काही चांगलं झालं की देवाच्या कृपेने होते आहे ही भाबडी असेल, पण श्रद्धा होती तिची..

बाबांना हे पातक करण्यापासून कसे थांबवायचे सुचतच नव्हते तिला... देवाचा सन्मान बाबांनी कधीच केला नव्हता, आईची हरकत नव्हतीच त्याला. शेवटी ज्याची त्याची श्रद्धा असे मानून ती पुढे चालायची..

देवावर विश्वास ठेवावा की नाही हे ज्याने त्याने आपापल्या अनुभवावरून ठरवावे पण दुसऱ्यांनी काय विचार करावा ? मग ती हक्काची बायको का असेना ठरवायचं अधिकार कोणालाच नसावा.

बाबांची गाडी आलिशान बंगल्यातून बाहेर पडत होतीच तेवढ्यात लाडक्या कन्येची - आस्थाची शाळेची बस आली. पाचवीतली आस्था रडत रडत बसमधून खाली उतरली. बाबांना गेटवर पाहून तर आस्था अजून हुंदके देऊन देऊन रडायला लागली..

आस्था म्हणजे जीव की प्राण होती बाबांचा.. !

तिला रडताना पाहून गाडी गेटमधेच ठेऊन बाबा धावत गेले तिच्यापाशी..

तिला कडेवर घेतलं आणि विचारलं , “काय झालं का रडते आहेस बाळा?काही लागलं का ? कोणी बोललं का ?सांग .. बाबा आहेना बघून घेईन कोणी माझ्या छकुलीला त्रास दिला?”

रडता रडताच तिने तिच्या दोन्ही मुठी उघडल्या तर हातात मातीचा गोळा होता. ती बोलायला लागली, “बाबा तो मयंक फार फार वाईट आहे,आमच्या शाळेत आज मातीचा गणपतीबाप्पा बनवायचं वर्कशॉप होते.. मी इतका सुंदर गणपती बनवला! मॅमनी पूर्ण क्लासला दाखवला आणि मला शाबासकी दिली.. शाळा सुटल्यावर मयंकनी माझा बाप्पा हिसकावला आणि शाळेतल्या माठात टाकून दिला सगळा बाप्पा विरघळला ...एवढीच माती मी हात घालून मिळवली.

बाबा इतका वाईट आहे मयंक,मी कधीच बोलणार नाही आता त्याच्याशी. असं कधी बाप्पाला पाण्यात फेकतात का? पण मला ड्राइवर काका म्हणले तू ह्या मातीपासून परत बनव देवबाप्पा, बाप्पाला कोणीच मोडू शकत नाही.
बाबा मला बाप्पा बनवायला कोण मदत करेल आता? ही माती पण उरली नाही..

बाबांना एकदम भरून आले होते..अश्रूंनी डोळे भरले होते, लाडक्या लेकीच्या डोळ्यातली हतबलता पाहून..
“मला बाप्पा बनवायचा आहे बाबा, त्या मयंकला रागवा तुम्ही खूप !” असे म्हणून आस्था परत जोरजोरात रडायला लागली..
खिशातल्या रूमालानी बाबांनी तिचे डोळे पुसले..
आणि म्हणाले चल आपण बनवू बाप्पा..
पण त्या आधी मला एक काम करायचे आहे,

असे म्हणून बाबांनी गाडी परत जागेवर लावली आणि सांभाळून पिशवी बाहेर काढली. आस्था म्हणाली, “ हे काय आहे बाबा आपले देव का ठेवलेत पिशवीत ?”
तसे बाबा आईकडे बघून म्हणाले, ”आईने ठरवलंय की ह्या वर्षी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा तू, तुझी आई आणि तुझे बाबा बनवून देव्हाऱ्यात ठेवणार.. हा गणपती कधीच पाण्यात जाणार नाही आपण विसर्जन सुपारीच्या गणपतीचं करायचं...

आज आपल्याला सगळे देव स्वच्छ करायचे आहेत.
बाकी सगळी तयारी आईने केलीये म्हणून ह्यावर्षी देव मी स्वतः चमकावणार आणि स्थापित करणार..
आस्थाने बनवलेल्या गणपती बाप्पाला आता अढळस्थान मिळणार ह्या देव्हाऱ्यात.
आस्था जा पटकन हातपाय धुवून ये आपण नविन माती आणायला जाऊ आपल्या बागेतून.”

आई शांतपणे बाजूला उभं राहून बाबांचा बदललेला अवतार बघत होती.
आस्था गेल्यावर हळूच म्हणाली, “काहो दुसऱ्याच्या लेकीच्या डोळ्यात पाणी पाहून हृदय द्रवल नाही तुमचं,स्वतःच्या लेकीच्या डोळ्यात अश्रू काही क्षण पण सहन झाले नाहीना ?”

बाबा हसून म्हणाले, “हो खरंय तुझं नाही बघवलं मला आस्थाला कासावीस होताना, पण माझे डोळे उघडले ह्या विघ्नहर्त्याने...
मी फार तोऱ्यात तुला म्हणालो होतो की बघू ‘तुझे देव स्वतःचं रक्षण करतात का ? निघालो होतो सगळ्यांना नदीत विसर्जन करायला आणि बघ ना बंगल्याच्या गेट च्या बाहेर सुद्धा त्यांनी मला जाऊ दिलं नाही.
आस्थाच्या रूपात त्यांनी माझे डोळे उघडले एवढंच !

देव नावाचं काही मूर्तरूप आहे का हे मी नाही सांगू शकणार.. पण एक अज्ञात शक्ती आहे जी कुठेतरी कधीतरी तुम्हाला स्वतःची जाणीव करून देते एवढं मात्र नक्की.”
आई समाधानाने बोलली, “मला तर ती शक्ती नेहमीच जाणवते.. आपल्यावरची कित्येक विघ्न देवाने दूर केली. पण आज विघ्नहर्त्याने स्वतःवरचं विघ्न दूर केलंय.

तेवढ्यात आस्था आली आणि ते तिघेही गणपती बाप्पा बनवण्यासाठी बागेतून माती घेऊन आले..
जो विधाता साऱ्या सृष्टीचं रक्षण करतो तो स्वतःचं रक्षण करणारच ना !

©️ऋचा मायी



Sunday, August 04, 2019

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट...

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!



दोस्त म्हणजे...

दोस्त म्हणजे... 

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Saturday, August 03, 2019

वाटसरू - चंद्रशेखर गोखले

वाटसरू - चंद्रशेखर गोखले 

निथळत राहणारा परीसर
माझ्या खिडकितून दिसतो
पण एकही वाटसरू
सुन्या रस्त्यावर नसतो.
- चंद्रशेखर गोखले


भिजणं वेगळं असतं ...

अनेक ठिकाणी एकाच वेळी 
पडत असला तरी प्रत्येकाचं 
भिजणं वेगळं असतं ... 
व. पु, काळे 


Friday, August 02, 2019

विझलो आज जरी मी

 विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही

- सुरेश भट      


Tuesday, July 23, 2019

भेटण्या पेक्षाही

भेटण्या पेक्षाही
तू दिसण्याचा आनंद मोठा
त्यात माझा निर्वीकार असण्याचा
आव खोटा.. .
-चंद्रशेखर गोखले



Thursday, July 18, 2019

सर एकच ती ओघळली

आपल्या Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग ची वाचक प्राजक्ता शिरुडे यांनी लिहलेले कविता. आपला अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.


सर एकच ती ओघळली , चिंब भिजाया थांब ना
नुकतीच कळी उमलली, गजरा माळाया थांब ना ।

नयनी अश्रू दाटले , झेलाया ते थांब ना
शब्द एकटे जाहले , गीत रचाया थांब ना ।

गुंतलेल्या वेड्या मना , समजावया थांब ना
हात हा हाती घ्याया पुन्हा , एकदा तू थांब ना ।

-प्राज



Tuesday, July 16, 2019

गुरु हा संतकूळीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

गुरु हा संतकूळीचा राजा 
गुरु हा प्राणविसावा माझा 

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 



पावसाचं एक गुपित

पावसाचं एक गुपित
सगळ्या ना नाही माहित
तो अक्षरांची ओंजळ टाकतो
प्रत्येक कविच्या वहीत...
- चंद्रशेखर गोखले


Monday, July 15, 2019

Gavat

आपल्या Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग चे वाचक अमोल खक्रे यांनी लिहलेले कविता. आपला अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.



Sunday, July 14, 2019

Lekhani Aaj Ghetli Tevha

आपल्या Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग चे वाचक आकाश जगताप यांनी लिहलेले कविता. आपला अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.



Tuesday, May 21, 2019

Sunday, May 19, 2019

गावातलं घर

ऐकलंय करोडोंच घर 
घेतलंय त्याने शहरात पण 
अंगण दाखवायला अजूनही 
मुलांना तो गावात आणतो


Saturday, May 18, 2019

माणूस

वरून मस्त टवटवीत 
तरी आतून तो कोमेजलेला.. 
कसा असतो ना माणूस 
माणसालाच न समजलेला.. 

©शब्द अनिकेत


Monday, May 13, 2019

प्रसंग- व पु काळे

जवळच्या माणसाचा स्वभाव 
कितीही पुरेपूर माहीत असला तरी, 
जगावेगळी समस्या उभी राहिली तर 
त्या प्रसंगी तो कसा वागेल, 
हे सांगता येत नाही. 
- व पु



Saturday, May 11, 2019

तू गेल्यावर - चंद्रशेखर गोखले

तू गेल्यावर जाणवलं
आता तुझ्याशिवाय जगायचं
तेंव्हा तुझेच शब्द आठवले
..."आणि शहाण्या सारखं वागायचं "
- चंद्रशेखर गोखले


Tuesday, May 07, 2019

अक्षय त्रितिया शुभेच्छा

अक्षय आनन्द
अक्षय समृद्धी
अक्षय सुख
अक्षय भरभराट
अक्षय प्रगती
अक्षय आरोग्य
अक्षय वात्सल्य
ह्या शुभ दिनी सर्व काही अक्षय असावं हीच सदिच्छा
अक्षय त्रितिया शुभेच्छा

Wednesday, May 01, 2019

Saturday, April 27, 2019

मी तुझं व्हायचं तर - चंद्रशेखर गोखले

मी तुझं व्हायचं तर
तुलाही माझं व्हायला हवं
हे ही खरं कुणाचं होअून जाणं
मनापासून यायला हवं..
- चंद्रशेखर गोखले


Friday, April 26, 2019

आठवणी...

आठवणी

नकळत सारे घडले
कळा अंतरीच्या सुखवुनी गेल्या
मागे वळता पाऊल अडले
निरोप घेता मन गहिवरले
सुख तू मजला दिले
मिठीत तुझ्या मि न्हाऊन गेले
दिवस सरता सरले
प्रत्येक भेटीत नव-नव ते गवसले
प्रेमात सुख मज उमगले
आठवणीचे नवं भंडार उघडले
हृदयाच्या कप्प्यात विसवले
कधी न विसरण्यासाठी मी अनुभवले

- प्रविण हटकर
आठवणी, Aathvani