Thursday, September 26, 2019

पाऊस दादा पाऊस दादा

आपल्या मराठी कविता ब्लॉग च्या वाचक
प्रतिभा येवले यांची कविता.
कशी वाटली नक्की कळवा.

पाऊस दादा पाऊस दादा
आता तरी जा की रे!
तुझे आई तुझे बाबा
वाट नाही का बघत रे!

वाट तुझी बघत होतो।
आम्ही किती वेड्यासारखी।।
आलास तेव्हा वाटले होते।
होतील तृप्त सर्व मनासारखी।।

बरसु लागला जेव्हा तु...
मुलं सारी बागडू लागली।
शेतं मळे सजु लागले।।
गुर ढोर शीतल झाली।
बळीराजा ही हरपुन गेला।।

तोच तुझा प्रकोप झाला।
सैरावैरा तु वाहु लागला।।
मनी ध्यानी नव्हते काही।
होते तेही राहीले नाही।।

कारे झालास स्वार्थी असा..?
कोण घेईल त्या गरिबांचा वसा..?
राहिला नाही जनावरांचा गोठा।
कहर केलास केवढा मोठा।।

'जारे जारे पाऊसा
तुला देतो पैसा'
'सांग सांग भोलानाथ
पाऊस जाईल का...?'
गाऊ लागली पोरं पोरी।
अश्रु त्यांचे पुसून भारी।।

जाशील जेव्हा घरी तुझ्या
विचार करशील कारे जरा..?
आलास जरी पुन्हा केव्हा।
जपुन येरे येशील जेव्हा।।

आहेस तु ह्या विश्वाचा पाठीराखा।
माझ्या बळीराजाचा अन्नदाता।।

✍️ प्रतिभा येवले 




No comments:

Post a Comment