गवताचं पातं - कुसुमाग्रज
गवताचं पातं वार्यावर डोलतं,
डोलतांना म्हणतं खेळायला चला
झर्यातलं पाणी खळा-खळा हसतं,
हसताना म्हणतं खेळायला चला
निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला
झिम्मड पावसात गारांची बरसात,
बरसात म्हणते वेचायला चला
छोटासा मोती लपाछपी खेळतो,
धावतांना म्हणतो शिवायला चला
मनीचं पिल्लू पायाशी लोळतं,
लोळतांना म्हणतं जेवायला चला
अहो, जेवायला चला
तुम्ही जेवायला चला
#कुसुमाग्रज
#कुसुमाग्रज
मौन - कुसुमाग्रज
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.मराठी भाषा दिननिमित्त सर्वांना शुभेच्छा !
ॐ नमः शिवाय कैलास राणा शिवचंद्र मौळी ! फणिंद्र माथा मुकुटी झळाळी! कारुण्य सिंधु भवदुःख हारी ! तुजविण शंभो मज कोण तारी
प्रिये ये निघोनी... ~ संदीप खरे
पती-पत्नी एक अनोखं नातं .........................................दोन वेगवेगळे मने ,जीव ,आता शुभमंगल सावधान नंतर....एकत्र आलेली असतात ...त्याच्या विश्वात रमणारा तोतिच्या विश्वात रमणारी ती ..आता एकमेकांचा विश्वातं.....रमणारी असतात......कारण आता ते ......साता जन्मा साठी एकत्र आलेली असतात ......आयुष्यात बरीच नाती अशी असतात जी आपल्या जन्मासोबत जोडलेली असतात.. जसे की, आई-वडील , बहिण-भाऊ , आजी आजोबा ,पण एक नातं असा आहे ते जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत काही कळत नाही...ते नातं म्हणजे " पती-पत्नीचं ".आयुष्याच्या वळणावर कधी काय होईल हे सांगता येत नाही .. कदाचित त्याच्यामुळेच " आयुष्य हा ऊन-पावसाचा खेळ आहे " असे म्हणतात ...कदाचित " आयुष्य हा एक रंगमंच आहे ". यातील आपण फक्त एक कलाकार आहोत ..जी पात्र आपणाला नियतीने लिहून दिलेली आहेत ,ती फक्त आणि फक्त आपण बजावत असतो ....ज्यांना अगोदर कधीही ही साधे बघितले ही नाही ,ही अचानक दोघेही लग्नाच्या अतूट बंधनात शुभमंगल सावधान नंतर एकत्र येतात .....जसे की " सूर्योदय व सूर्यास्त " हा दिवसाचा अविभाज्य भाग होऊन जातात ..." पती-पत्नी " . हे नातं विश्वास , त्यागं , समर्पण , जिव्हाळा , आपुलकी , निस्वार्थ प्रेम , या धाग्याने जोडलेले असत...पूर्वी दोघेही एकमेकांच्या विश्वास रमणारी , आता एक दुसर्याच्या विश्वात आपली दोघांची स्वप्ने बघत असतात ....एकाला कधीही तडजोड माहित नसते ..तरीपण तिच्यासाठी तो जीव लावून करत असतो ..कारण त्याला आता तिचे आयुष्य सुखी करायचे असते ...तर दुसरीकडे एकदम आनंदात वावरणारी .. " जिला आई-वडिलांनी तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळ केलेली " ती ...आता दिवसभर संसाराच्या चक्रात स्वतःला झोकून देते...जी कधीही चुलीसमोर न बसलेली ...आता ती त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने गोड गोड स्वयंपाक करत असते ...कारण आता ती त्याच्या साठी लागणारी प्रत्येक गोष्ट , अगदी आनंदाने व प्रेमाने करत असते.....कारण आता तिला सुखी संसार करायचा असतो ....आता एकमेकांना एक गोष्ट कळून चुकलेली असते " आपलं सुख हे एक-मेकांच्या सुखात आहे " आयुष्याच्या चढ-उतारात ते एकमेकासोबत खंबीरपणे उभे असतात ....म्हणूनच म्हणतात ना एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो ....ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची " अर्धांगिनी " असते ..दोघा पासून सुरू झालेला संसाराचा गाडा पुढे वाढत जातो...दोघांचे तिघे होतात ...पण त्यांच्या प्रेमात मात्र कायमच वाढ होत असते... आणि सगळ्यात महत्वाचे होते जेव्हा त्याला तिच्यात त्याची " प्रेयसी " दिसते ... व तिला त्याचातं तिचा " प्रियकर " दिसतो ....मग तर कोणाची नजर लागेल असा हा " राजा-राणीचा " संसार होतो ....आयुष्यामध्ये दोघेही एकमेकांशी पूर्णपणे समरस झालेली असतात ... आता त्याच्या पत्नीचा रोल फार मोठा झालेला असतो ...कधी कधी संकटात ती त्याची ढाल बनून उभी राहते ... समोर येणाऱ्या प्रत्येक घटनेला ती त्याच्यासोबत असते ..जरी ते दोनं जीव असले ..तरी आता ते एक जीव झालेले असतात ...खरंतर दोघांची एकमेकांना साथ त्यांच्या वयाच्या उतरत्या काळात असते ...कारण तेव्हा " पैसा हा गोण झालेला असतो " .कारण त्यांची लहान पाखरे आता मोठी झालेली असतात ....स्वतःच्या पंखावर ऊडू लागलेली असतात ...ते त्यांचे स्वतःचे घरटे तयार करण्यात मग्न असतात ....त्यावेळेस मात्र या दोघांचा पंखातले बळ पहिल्यासारखे राहिलेले नसतं... पण त्यांचं एकमेकावर असलेलं निस्सीम प्रेम त्यांना परत बळं देतं ...कारण आताही तो तिच्यात प्रियसी बघत असतो ...व ती त्याचातं प्रियकर बघत असते ...." नातं पती-पत्नीचं जरा ...जगा वेगळं असतं ....दोघात कुठून एवढं प्रेम असतं ....याचं उत्तर त्यांच्यापाशी नसतं .....संसाराचा रथाची हे दोन चाके असतात ......कधी कधी एक बिघडलं तरी ..ते एकमेकाला सांभाळून घेतात...डॉ .सदाशिव रोकडेसुरत9824518156