Friday, February 28, 2020

गवताचं पातं - कुसुमाग्रज Gavtacha Pata Kusumagraj

गवताचं पातं -  कुसुमाग्रज 

गवताचं पातं वार्यावर डोलतं,
डोलतांना म्हणतं खेळायला चला

झर्यातलं पाणी खळा-खळा हसतं,
हसताना म्हणतं खेळायला चला

निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला

झिम्मड पावसात गारांची बरसात,
बरसात म्हणते वेचायला चला

छोटासा मोती लपाछपी खेळतो,
धावतांना म्हणतो शिवायला चला

मनीचं पिल्लू पायाशी लोळतं,
लोळतांना म्हणतं जेवायला चला
अहो, जेवायला चला
तुम्ही जेवायला चला

#कुसुमाग्रज 

No comments:

Post a Comment