कणाकणांचे जीवन #राम
मनामनांचा संगम राम
कणाकणांचे जीवन राम ।।धृ।।
सुंदरतेचे सृजन राम
शब्द सुलभ संजीवन राम
सनातन धर्म प्रवर्तक राम
रघुकुलदीपक आदर्श राम ।।१।।
भावभक्त तारक राम
नित्य दिवाकर पावन राम
कर्मफलाचा दाता राम
सत्य मनोहर दर्शन राम ।।२।।
सुखदायी आश्वासक राम
चैतन्य प्रभाकर शाश्वत राम
दीनजनांचा रक्षक राम
जगदोद्धारक व्यापक राम।।३।।
सिद्धसंकल्प धारण राम
सगुण निरंजन परमेश्वर राम
ध्यान चिंतन रंजन राम
शौर्य धैर्य मार्ग दर्शक राम ।।४।।
भवभयचिंता हारक राम
ज्ञान तपस्या सार्थक राम
दिव्य सुबोध साधन राम
समर्थ सौख्यदायक राम ।।५।।
श्री. विद्याधर विष्णु वैशंपायन, सज्जनगड
No comments:
Post a Comment