Wednesday, October 14, 2015

नवरात्र.... रंग

नवरात्र....

एक रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा.

दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा.

तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा.

चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.

पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.

सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.

सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.

आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.

नवा रंग "स्त्री पुरुष समानता" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा.

जगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होईल!

No comments:

Post a Comment