लांबसडक त्या बोटामधुनी
झरझर झरते कण रांगोळी
होते रंग पुडीत लपले
भरभर ते पडले बाहेरी ।।
रंगामागुन रंग साजिरे
. . . . .एकामागुन दुसरे आले
. . . . . रंगसंगती जमली का ते
. . . . बघण्यासाठी जमले सारे ।।
ज्योत दिव्याची सुवर्ण पिवळी
आली बघण्याला रांगोळी
एकीसंगे दुसरी आली
ओळीमागुन रचल्या आेळी ।।
प्रकाश दिसला तिमिर पळाला
. . भवताल कसा तेजाेमय झाला
. . .रोज जाउदे नैराश्य लयाला
. . . सदा येउदे सुख उदयाला ।।
वैभवास येऊदे बरकत
राहू दे खणखणीत तब्यत
समाधान अन् शांति बरसत
आनंदे मन राहो विहरत ।।
हिरे माणके हवी कशाला
. . . त्याहुन भारी तुमची संगत
. . . आपली मने भिडाे मनाला
. . .जीवनात येऊदे रंगत ।।
॥ शुभ दीपावली ॥
Sunday, October 30, 2016
रांगोळी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment