Saturday, April 27, 2019

मी तुझं व्हायचं तर - चंद्रशेखर गोखले

मी तुझं व्हायचं तर
तुलाही माझं व्हायला हवं
हे ही खरं कुणाचं होअून जाणं
मनापासून यायला हवं..
- चंद्रशेखर गोखले


Friday, April 26, 2019

आठवणी...

आठवणी

नकळत सारे घडले
कळा अंतरीच्या सुखवुनी गेल्या
मागे वळता पाऊल अडले
निरोप घेता मन गहिवरले
सुख तू मजला दिले
मिठीत तुझ्या मि न्हाऊन गेले
दिवस सरता सरले
प्रत्येक भेटीत नव-नव ते गवसले
प्रेमात सुख मज उमगले
आठवणीचे नवं भंडार उघडले
हृदयाच्या कप्प्यात विसवले
कधी न विसरण्यासाठी मी अनुभवले

- प्रविण हटकर
आठवणी, Aathvani


Tuesday, April 23, 2019

जीवन - ऐश्वरी खामकर

आपल्या मराठी कविता ब्लॉग च्या सदस्या ऐश्वरी खामकर यांची कविता.

जीवन

सखी जीवन हे असचं असतं
तुझं आणि माझं सारखचं असतं
ज्या कुटूंबात वाढून मोठ व्हायचं असतं
त्याच कुटूंबाला सोडून जायचही असतं
ज्या आईचं बोट घरून चालणं
शिकायचं असतं
त्याच बोटाने कुंकूं लावून
निघायचं असतं
ज्या वडिलाच्या खांद्यावर खेळून
मोठ व्हायचं असतं
त्याचं खांद्यावर डोके ठेतून
रडायचं असतं
ज्या बहिण - भावाला भांडून
एडवायचं असतं
त्यांनाच सोडून जाताना
रडायचही असतं
सखी जीवन हे असंचं असतं

-ऐश्वरी खामकर
Jivan, जीवन



Monday, April 22, 2019

पुन्हा सोमवार !

पुन्हा सोमवार ! 

पुन्हा सोमवार ! आला देवा

जगावे म्हणता ! जरा बैजवार
पुन्हा सोमवार ! आला देवा

बॉक्सात ईमेली ! ईमेलीत बॉस
ईझी वेटलॉस ! बैठ्याजागी

आता रातंदिस ! पीपीटी चा खेळ
डोळ्यामाजी तेल ! घाला लेको

पावलोपावली ! मेंदूला ये फीट
एक्सेलची शीट ! उतू जाता

कधी एजीएम ! कधी कॉन्फरन्स
किती टॉलरन्स ! दाखवावा

आता ६ दिस ! गोठला बा काळ
१४४ ! लागू झाले

एक रविवार ! काढिला लोळून
त्याचे किती ऋण ! फेडायाचे

– वैभव जोशी
पुन्हा सोमवार, वैभव जोशी


Sunday, April 21, 2019

माझ्या, तुझ्या, सर्वांच्या स्वप्नातलं ... एक घर...

माझ्या, तुझ्या, सर्वांच्या स्वप्नातलं ... एक घर...

एक घर दगडांचं
जुन्या कोरिव विटांचं
सोप्याचं अन् पडवीचं
बहरलेल्या अंगणाचं
दारापुढल्या तुळशीचं
घडवंचीवरच्या कळशीचं
एक घर…

एक घर माणसांचं
दादाच्या खट्याळ हसण्याचं
ताईच्या खोट्या रुसण्याचं
आजोबांच्या कडक शिस्तीचं
आजीच्या गोड गोष्टींचं
आईच्या अथांग मायेचं
बाबांच्या खंबीर छायेचं
एक घर…

कवी - अज्ञात
स्वप्नातलं एक घर



Thursday, April 18, 2019

इच्छा - रविंद्रनाथ टागोर

इच्छा

विपत्ति मध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही.
विपत्ती मध्ये मी भयभीत होऊ नये इतकीच माझी इच्छा!!

दुक्ख तापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही...
दुक्खावर जय मिलवता यावा इतकीच माझी इच्छा.

माझ्या मदतीला कोणी न आल्यास माझे बळ मोडून पडू नये
इतकीच माझी इच्छा.

माझे रक्षण तू करावेस, मला तारावेस ही माझी इच्छा नाही,
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे इतकीच माझी इच्छा.

माझे ओझे हलके करून तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वहायाची ताकद माझ्यात असावी इतकीच माझी इच्छा.

सुखाच्या दिवसात नतमस्तक होउन
मी तुझा चेहरा ओलखुन काढीन.
दुख्खाच्या रात्री सगळे जग जेव्हा माझी फसवनूक करेल
तेव्हा तुज्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये
इतकीच माझी इच्छा!

रविंद्रनाथ टागोर
इच्छा - रविंद्रनाथ टागोर


Sunday, April 14, 2019

!! डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!

!! डॉ.बाबासाहेब आंबेडकर !!
यांच्या१२८ व्या जयंती दिनी त्यांच्या स्मूर्तिस विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम ...🙏
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, Babasaheb Ambedkar



Saturday, April 13, 2019

श्री राम नवमी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास प्रभू श्री रामचंद्र यांचा आशीर्वाद लाभो हीच शुभेच्छा. जय श्री राम.

श्री राम नवमी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास प्रभू श्री रामचंद्र यांचा आशीर्वाद लाभो हीच शुभेच्छा. जय श्री राम. 🙏

Shree Ram Navami,


Saturday, April 06, 2019

Marathi Nutan Varsha-Gudi Padva

Marathi Nutan Varsha-Gudi Padva
उभारा गुढी सुखसमृद्धीची
सुरुवात करूया नववर्षाची
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
वाटचाल करूया नवआशेची…..
माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना व त्यांच्या परिवाराला
गुडी पाडव्याच्या आणि
मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi Nutan Varsha-Gudi Padva