एक घर दगडांचं
जुन्या कोरिव विटांचं
सोप्याचं अन् पडवीचं
बहरलेल्या अंगणाचं
दारापुढल्या तुळशीचं
घडवंचीवरच्या कळशीचं
एक घर…
एक घर माणसांचं
दादाच्या खट्याळ हसण्याचं
ताईच्या खोट्या रुसण्याचं
आजोबांच्या कडक शिस्तीचं
आजीच्या गोड गोष्टींचं
आईच्या अथांग मायेचं
बाबांच्या खंबीर छायेचं
एक घर…
कवी - अज्ञात
No comments:
Post a Comment