Friday, June 03, 2016

पाऊसवेळा

पाऊसवेळा

तू केस झटकलेस
चेहर्यावर पाऊस आला …
चेहरा झाकला हातांनी
ओंजळभर पाऊस आला…

पदर उडाला झुळकेने
वार्यावर पाऊस आला …
तू हसून पाहिलं जरा
काळजावर पाऊस आला…

एकच कविता वाचलीस
डायरीभर पाऊस आला,
आंगणातून थोडं डोकावलस
पायरीवर पाऊस आला!!

मेघांना आर्जवे केलीस
प्रहरभर पाऊस आला …
एकदा भिजली जराशी
शहरभर पाऊस आला!!

– उनाड

No comments:

Post a Comment