Tuesday, June 07, 2016

तुझ्यासाठी....

तु सोडुन गेलेल्या वाटांवरती, आता मी देखिल फिरकत नाही
तुला सोबत न घेउन आलेलं, बहुदा त्यांनाही ते आवडत नाही
अशी आल्यापावली माझी कितीदा परत पाठवणी केलीय त्यांनी.................तुझ्यासाठी

तु दिसत नसलेल्या सांजेपासून, बेलगाम उधळलाय तो
प्रत्येक ओहोटीशी झुंज देत, तुझ्या शोधात निघालाय तो
हर भरतीला वेड्यापरी सगळे किनारे पिंजुन काढलेत त्याने....................तुझ्यासाठी

आजकाल तु या गावात नसतेस, हे बहुदा कळलयं आहे त्याला
खुणेच्या सगळ्या जागांवर अडला, तरी भेटली नाहीस त्याला
आजही तुझ्या आठवसरीं डोळ्यांत साठवुन पुन्हा पुन्हा दाटुन येतो तो............तुझ्यासाठी

तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय
खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय
जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी

हे सगळे माझ्याकडे "तुला" मागतात्, पण मी दाद देत नाही
तुला गमावल्याचा दोष मला लावतात्, तरी मी काहीच बोलत नाही
तुझ्या प्रतारणेच्या जखमा उरात दडवून आता कायमचा शांत झालोय मी..........तुझ्यासाठी

एक एकटा एकटाच

1 comment:

  1. नमस्कार मित्रांनो.तुमच्याकडे Android phone आहे? तर मग कमवा Rs. 5000- Rs. 40000/month मी आपणाला पंतप्रधान मोदी जींच्या Digital India concept, म्हणजे आज एका अशा online job बद्दल माहिती देणार आहे,जो आपणाला आज ना उद्या join करावाच लागेल कारण, हे प्रत्येकासाठी compulsory होणार आहे.जितक्या लवकर join कराल, तितका जास्त फायदा.आपणास खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि जाणून घ्या. आपल्या यशाचे गुपित.दररोज हजारो लोक join होत आहेत ,त्वरा करा.join करण्यासाठी तुम्हाला पैसे अजिबात लागणार नाहित.फक्त Android smartphone with internet connection लागेल. http://champcash.com/321260 Click the link above and discover the secret of earning money online from your Android smartphone without investmentClick करो और जानो,online earnings के बारे में. बिना कोई पैसे लगाए.For more information send msg INFO WhatsApp no. 8806656508

    ReplyDelete