Friday, May 29, 2020

जीवन जागाव ते गुलाबा कडून शिकाव...

प्रेमात कोण मन तोडत,
मैत्रीत कोण विश्वास तोडत,
जीवन जागाव ते गुलाबा कडून शिकाव,
जो स्वतः तुटून दोन मनांना एकत्र करत....



Thursday, May 28, 2020

Veer Savarkar Jayanti

स्वातंत्र्याचे सुंदर स्वप्न
आणले ज्यांनी माते चरणी
लढले ,कष्टले शत्रूबरोबर धेर्याने रणांगणी

ठेविले तुलसीपत्र आपल्या घरावरती
प्रेम व भक्ती होती ज्यांची देशाप्रती

भोगिल्या अनंत शिक्षा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी
झटत राहिले जातीपातीच्या बंधनातून समाज सोडविण्यासाठी

एकच ध्यास एकच ध्येय भारत मातेच्या चरणी
मुक्त करण्या मातेला इंग्रजांच्या जोखडातूनी

खरे वीर जाहले स्वातंत्र्य लढ्याचे मानकरी
जनतेने बहाल केली उपाधी स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रती

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन


Friday, May 15, 2020

Sunday, May 10, 2020

आई

मातृ दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा!

Monday, March 09, 2020

होय महाराजा !

बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, मुंबानगरीच्या बा देवा महाराजा...

आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा, टोरा, म्हातारे-कोतारे मिळान साजरो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि काय जी इडा पीडा, वाकडा-नाकडा असात त दूर कर रे महाराजा...

ह्या होळी सोबत सगळ्यांच्या मनातलो राग, रूसवो-फूगवो जळान खाक होऊ देत आणि सगळी माणसां माणुसकी एकमेकांसोबत नांदु देत रे महाराजा ...

होय महाराजा !


Sunday, March 08, 2020

स्त्री..

💐 दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ....💐

स्त्री...

तुझ्या शक्तीला सलाम
तुझ्या कर्तुत्वाला सलाम
तुझ्या धेर्याला सलाम

कितीही लढलीस
कितीही पडलीस
कितीही सोसलंस
तरी तुच तुला सावरलंस

नाती सांभाळुन पिढी जपणारी तु
नोकरी सांभाळुन घर जपणारी तु
घर सांभाळुन घर चालवणार्याला जपणारी तू
प्रत्येक पिढीला एक आदर्श देणारी तु

स्त्री..

तुझ्या जन्माला सलीम
तुझ्या कार्याला सलाम

- प्रतिभा येवले


Friday, February 28, 2020

गवताचं पातं - कुसुमाग्रज Gavtacha Pata Kusumagraj

गवताचं पातं -  कुसुमाग्रज 

गवताचं पातं वार्‍यावर डोलतं,
डोलतांना म्हणतं खेळायला चला

झर्‍यातलं पाणी खळा-खळा हसतं,
हसताना म्हणतं खेळायला चला

निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला

झिम्मड पावसात गारांची बरसात,
बरसात म्हणते वेचायला चला

छोटासा मोती लपाछपी खेळतो,
धावतांना म्हणतो शिवायला चला

मनीचं पिल्लू पायाशी लोळतं,
लोळतांना म्हणतं जेवायला चला
अहो, जेवायला चला
तुम्ही जेवायला चला

#कुसुमाग्रज 

Thursday, February 27, 2020

मौन - कुसुमाग्रज

#कुसुमाग्रज

मौन - कुसुमाग्रज


मराठी भाषा दिननिमित्त सर्वांना शुभेच्छा !

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषा दिननिमित्त सर्वांना शुभेच्छा !


Friday, February 21, 2020

ॐ नमः शिवाय - Mahashivratri

ॐ नमः शिवाय 🙏
कैलास राणा शिवचंद्र मौळी ! फणिंद्र माथा मुकुटी झळाळी! कारुण्य सिंधु भवदुःख हारी ! तुजविण शंभो मज कोण तारी


Wednesday, February 19, 2020

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा 🚩🚩🚩