Wednesday, January 31, 2018

Saath साथ


from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग http://ift.tt/2GyROkR
via IFTTT

Monday, January 29, 2018

*आज्जीने आधुनिक रितीने सांगितलली पौराणिकगोष्ट*



*आज्जीने आधुनिक रितीने सांगितलली पौराणिकगोष्ट*
*इंटरनेटच्या माध्यमातून*
. "3G!की दत्तगुरू!!”
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त" भाजी निवडतांना एकीकडे माझा जप चालू होता,इतक्यात माझ्या नातवाचा, रोहिनचा प्रश्न आला.
'एव्हरीटाईम हे काय म्हणत असतेस तू आज्जी ?'
'ही माझ्या जपाची " *टॅग लाईन* " आहे.'
'पण हे म्हणत असलीस की तुझं माझ्याकडे लक्षच नसतं' फुरंगटलेल्या रोहिनची तक्रार.
रोहिनचा रूसवा दूर करण्यासाठी,पटकन संवाद साधला जाण्यासाठी म्हणून त्याच्या स्टाईलच्या मराठीचा आधार घेत मी म्हटलं,
‘बच्चमजी,व्हिडिओ गेम -मोबाईल मध्ये रमलात की आपणही माझ्या प्रश्नाला आन्सर देत नाही. अगदी तश्शीच मी पण "3G"मध्ये रमून जाते.'
'आज्जी,"हे" म्हणायला यू आल्सो नीड "3G"?'
रोहिनच्या चेहरयावरचं आश्र्चर्य बघून मला हसू आवरलं नाही.त्याला समजवायला म्हटलं,
'अरे,दत्तात्रय म्हणजे 'ब्रम्हा -विष्णु -महेश" *टुगेदर* म्हणजे "3G"च नाही का ?अर्थात माझ्या आणि हल्ली सगळ्यांची 'नीड' असलेल्या "3G" मध्ये एक मेजर फरक आहे.'
'फरक म्हणजे डिफरन्स,राइट?तो कोणता?' रोहिनने खात्री करण्यासाठी विचारलं.
'सांगते! *सगळे ज्याचे फॅन झालेत 'ते "3G" मिळतंय की नाही ,नसेल तर कोणत्या डायरेक्शनला मिळेल हे सर्व चेक करावं लागतं.पण मी नुसतं "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असं म्हटलं तरी इनफ आहे*
'का ?असं का ?आणि "दिगंबरा" म्हणजे ?' रोहिनच्या अनेक शंका धडाधड बाहेर आल्या.
'अरे,"दिगंबरा"चा अर्थ सर्व दिशांना व्यापून राहिलेला म्हणजे स्प्रेड होऊन राहिलेला."दिगंबरा"
हे दत्ताचं अजून एक नाव आहे.'
या अशा संवादानंतर "3G" ची गोष्ट सांगण्याची रोहिन मागणी करणार याची मला खात्री होती.
'So श्रीदत्त म्हणजे *3 in one* देव आहे?कसं काय? सांग ना आज्जी ' गेममध्ये पाॅझ घेऊन माझ्याजवळ येऊन रोहिननं विचारलं.अशा सुवर्ण संधीचा लाभ सोडून देणं मला शक्यच नव्हतं.मी लगेचच गोष्टीला सुरूवात केली.
'दत्तात्रय या नावातच त्यांच्या वडिलांचं नाव लपलेलं आहे.पिता अत्रीऋषी आणि माता अनुसूया यांचा सुपुत्र means son म्हणजेच "श्रीदत्तात्रय"!फार पूर्वींची गोष्ट-अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी "ब्रम्हा-विष्णु-महेश" या देवांची कठोर आराधना केली.'
'कठोर आराधना म्हणजे?' मला मध्येच अडवत रोहिनचा प्रश्न आलाच.
'म्हंजे *"hard worship*!त्याला मराठी शब्द अर्थासहित समजावणं हे माझं आवडतं काम. मातृभाषेची हसतखेळत ओळख करून द्यायला "गोष्ट" हे एक उत्तम साधन आहे असं मला वाटतं.
'म्हणजे गेममध्ये वरची लेव्हल क्राॅस करायला मला जसं *continuous hard try* करायला लागतं....'
त्याच्या विश्वातल्या गोष्टींशी अर्थ रिलेट करण्याच्या रोहिनच्या प्रयत्नाची गंमत वाटून मी पुढे सांगायला सुरूवात केली.
'अत्रीऋषींच्या आराधनेमुळे ब्रम्हा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रसन्न झाले.अत्रीऋषी -अनुसूयेला "त्रिदेव पुत्रप्राप्ती" झाली म्हणजेच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला.दत्तजयंतीच्या दिवशी "त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा...."ही आरती आपण म्हटलेली आठवतेय ?'
मला मध्येच थांबवत रोहिनची प्रतिक्रिया आली,
‘आरतीमध्ये "त्रैमूर्ति" का म्हटलंय ते आता मला कर्रेक्ट समजलंय आजी. *पण दत्ताच्या तसबिरीमध्ये गाय,कुत्रे एटसेट्रा का असतात आज्जी* ?'
खरंतर त्याच्या तोंडून 'तसबीर' हा शब्द ऐकून मला अगदी गहिवरून आलं.माझे 'मराठी प्रयत्न' रूजतांना पाहून छान वाटतं होतं.पण आधीच चमकदार असलेल्या रोहिनच्या डोळ्यातली उत्सुकता अधिक न ताणता मी म्हटलं,
*'पृथ्वी म्हणजे "मदर अर्थ" कशी एखाद्या आईप्रमाणे सगळ्यांच्या डिमाण्डस् फुलफिल करते. तसबिरीतली गाय हे पृथ्वीचं "प्रतिक" आहे."प्रतिक" म्हणजे symbol.* आता पहा ,ते *"3G" symbol* दिसत असलं की सगळे कसे खूश असतात.त्यामुळेच तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या पूर्ण होतात नं! ४कुत्रे हे आपल्या वेदांचं प्रतिक आहे-"ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद" !'
'वेद म्हणजे काय आजी ?' रोहिननं अधीरपणे विचारलं.
खरं तर "वेद" म्हणजे काय हे सोप्पं करून सांगणं हे खरोखरच अवघड काम होतं.
तरिही मी म्हटलं,
'काही माहिती हवी असेल,काही क्वेरी असेल,
काही अडलं असेल तर हल्ली सर्वजण *विकिपिडिया रिफर करतात* राइट ? *वेद' म्हणजे आपल्या अॅन्सेस्टर्सनी जपलेलं* "ज्ञानाचं भांडार" आहे * ' त्याला चटकन समजेल अशा प्रकारे समजावण्याचा मी आपला एक प्रयत्न केला.
'व्हेरी इंटरेस्टींग आज्जी.अजून सांग नं 'आता रोहिनला राहवेना.
'शंख-चक्र हे श्रीविष्णुचं तर त्रिशूल-डमरू हे श्रीशिवाचं प्रतिक आहे.मला आठवतंय ,तू एकदा मोबाईलमधले डमरू आणि चक्र चे सिम्बाॅल दाखवले होतेस,हो नं?'
'अगदी बरोबर आज्जी, *ब्लूटूथ* साठी डमरू आणि *जनरल सेटिंग्ज* ला चक्र "अशा साइन्स असतात.
आज्जी हे थोडंसं ब्राॅड पण *व्हाॅटस्अॅपच्या साइन सारखं दिसतंय ते काय आहे*?'
'अरे त्याला कमंडलू म्हणतात.कमंडलू आणि जपमाला हे श्रीब्रम्हाचं प्रतिक आहे.'
व्हाॅटस्अॅपच्या सिम्बालशी त्याने शोधलेल्या साधर्म्याचं मला मनात कौतुक वाटत होतं.माझ्या गोष्टीचे तपशील त्याला आवडलेत असं लक्षात येत असतानाच पुढचा प्रश्न आला.
*पण मग आज्जी श्रीदत्तांचा जप करतांना तू "अवधूत चिंतन ....."असं का म्हणतेस*?अवधूत म्हणजे ?'
'अवधूत हेही श्रीदत्ताचंच नाव आहे.ह्या नावाचं मिनिंग आहे "नेहमी आनंदात,वर्तमानात रहाणारा".
म्हणून तर मी म्हटलं की ही माझ्या जपाची " *टॅग लाईन* आहे,नेहमी आनंदात ठेवणारी.पहा,
आजकाल "3G" चा टॅग स्पष्ट असेल तर असतात की नाही सगळे आनंदात अन् अपडेटेड?
काय?'
रोहिनला मनापासून हसू आलं ,अन् अर्थातच मलाही!खूपशा मराठी शब्दांची अर्थासहित रोहिनला ओळख करून दिली,एक पौराणिक कथा त्याला आवडेल अशा पध्दतीनं सांगता आली ह्याचा मलाही आनंद वाटला.
सध्याच्या "4G" च्या जमान्यात मी रोहिनला माझ्या "3G" शी कनेक्ट करू शकले.आणखी काय हवंय माझ्यासारख्या आज्जीला ?
अनुजा बर्वे.
प्रसिध्दी- स्वप्ना दिवाळी अंक २०१७

Sunday, January 28, 2018

Saturday, January 27, 2018

साधन मदिरा


साधन मदिरा

व्यथा वेदना विसरायाचे साधन मदिरा
स्वतः स्वतःला फसवायाचे साधन मदिरा

गतकाळाच्या रंगमहाली मैफल सजते
भणंग स्वप्ने सजवायाचे साधन मदिरा

बंद उसासे , बंद हुंदके , बंद ओठही
दोन आसवे ढाळायाचे साधन मदिरा

जी काही नासाडी होते ती देहाची
झुरणारे मन रिझवायाचे साधन मदिरा

आनंदोत्सव असेल अथवा असो दुखवटा
झुलवायाचे फुलवायाचे साधन मदिरा

कुरतडणार्‍या कातरणार्‍या कातरवेळी
एकाकीपण रिचवायाचे साधन मदिरा

तुटले फुटले कुस्करले वा जरी चिरडले
सारे काही सांधायाचे साधन मदिरा

रोखुन धरलेल्या श्वासासम कितीक गोष्टी
बंद कवाडे उघडायाचे साधन मदिरा

उजाड झाल्या नगरामध्ये पुन्हा एकदा
नवीन इमले बांधायाचे साधन मदिरा

जे काही कोरले ” इलाही” ह्रुदयावरती
पुसण्यासाठी गिरवायाचे साधन मदिरा

– इलाही जमादार

Tuesday, January 23, 2018

😊💞 !!..#_तू_मला_मिठासारखी..!! 💞😊


😊💞 !!..#_तू_मला_मिठासारखी..!! 💞😊
••••••••••••••••••••••••🌹•••••••••••••••••••••••••
सत्यभामा आणि रुक्मीणी या आपल्या दोन बायकांशी एकदा भगवान गोपालकृष्ण गप्पागोष्टी करीत बसले असता, गप्पांच्या ओघात सत्यभामेनं विचारलं, 'नाथ, मी आपल्याला कशी प्रिय वाटते.?' गोपालकृष्ण म्हणाले, 'सत्यभामे ! तु मला श्रीखंडासारखी प्रिय वाटतेस.' लगेच रुक्मिणीनंही तोच प्रश्न भगवंताला विचारला असता ते मुद्दाम म्हणाले, तू ना रुक्मिणी ? तु मला मिठासारखी, प्रिय वाटतेस..!!
आपण आपल्या पतीला श्रीखंडाप्रमाणे प्रिय असल्याचे ऎकून सत्यभामा बेहद्द खुष झाली, तर 'पतीला आपण मिठाप्रमाणे वाटतो, 'असं कळताच रुक्मिणी तिथून रागानं तरातरा-निघून गेली. आपल्याला सर्वात अधिक प्रिय असलेली रुक्मिणी रागावल्याचे पाहून, गोपालकृष्णांनी स्वयंपाक्याला त्या दिवशी स्वयंपाकात मीठ बिलकूल न घालण्याची सूचना केली आणि जेवणात गोडाची वस्तू म्हणून श्रीखंड करायला सांगितले. स्वयंपाक तयार झाला.
अगदी सुचनेनुसार पुर्णपणे आळणी. गोपालकृष्ण जराही कुरबुर न करता नेहमीप्रमाणे पोटभर जेवले. त्यांच्यानंतर रुक्मिणी व सत्यभामा या जेवायला बसल्या. वरणभाताचा पहिला घास तोंडात घालतात, तो वरणाला मीठ नाही. आमटी व भाजी चाखून बघितली, तर त्यांचीही तीच गत ! अगोदरच रागावलेली रुक्मिणी स्वयंपाक्यावर खेकसून म्हणाली, 'आज स्वयंपाक करताना तुझं लक्ष कुठे दुसरीकडे होतं का?' स्वयंपाक पार आळणी झालाय !' भगवंताच्या सुचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला, 'आज मीठ संपल होत म्हणून स्वयंपाक आळणी करणं भाग पडलं. अर्थातच श्रीखंड होतं; तेव्हा बाकीच स्वयंपाक आळणी असला तरी निभावून नेता येइल, असं मला वाटलं.'
रुक्मिणी म्हणाली, 'श्रीखंडाशिवाय जेवण अडून रहात नाही. इतर सर्व स्वयंपाक चांगला असला की झालं, आणि इतर सर्व स्वयंपाक मिठाशिवाय चांगला होणं शक्य आहे का ?' रुक्मिणीन पानात प्रथम वाढलेलं अन्न कसंबसं संपवलं, आणि ती अर्धपोटीच उठून आपल्या महालात जाऊन फुरंगटून बसली. तिच्या पाठोपाठ गोपालकृष्ण तिच्या महालात गेले आणि मुद्दाम म्हणाले, 'रुक्मिणी आज तुझं जेवण एवढ्या लवकर कसं झालं ? मला वाटलं, आज जेवणात श्रीखंडाचा बेत आहे, तेव्हा जेवणाचा सावकाश आस्वाद घेत घेत होणार...
रुक्मिणी रागानं म्हणाली, 'श्रीखंडाचं कौतुक तुम्हाला; मला नाही. बाकीचा स्वयंपाक नुसता आळणी होता; आणि कारण विचारलं तर बल्लवाचार्य म्हणतो, मीठ संपून गेलंय ! मिठाशिवाय स्वयंपाकाला जरातरी चव येईल का?' यावर गोपालकृष्ण पटकन म्हणाले, ' मीठ नाही म्हणजे स्वयंपाकाला चव नाही, हे तुच म्हणतेस ना ? मग मी मघाशी म्हणालो की तू मला मिठासारखी प्रिय आहेस. अग, तुझ्याशिवाय माझं जीवन बेचव होऊन जाईल.' पतीच्या बोलण्यातली ही खोच लक्षात येताच रुक्मिणी कळी एकदम खुलुन गेली..!!

Sunday, January 21, 2018

|| गणेश जयंती हार्दीक शुभेच्छा ||


|| गणेश जयंती हार्दीक शुभेच्छा ||
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांनासुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.👏🏻
!! गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!
💐🐀🐀🐀🐀🐀

Saturday, January 20, 2018

मुलगी


संध्याकाळी ७.०० च्या सुमारास बाळ येण्याची चाहुल लागली तसा,
मी O.T. पुढे कान देऊन आणि डोळे विस्फारुन येरझारया मारु लागलो..!!
७.३८ वाजता बाळाच्या रडण्याचा आवाज आला.
आणि मी बाळाच्या स्वागतासाठी O.T. च्या बाहेर सज्ज झालो..!
रात्रीच्या शांततेत बाळाच्या रडण्याचा आवाज (बापाच्या आवाजाला खुन्नस) संपुर्ण हाॅस्पिटल दणाणुन सोडत होता.
आणि पहिलाच गुण बापाचा घेतल्याचं आत्मिक समाधान देत होता..!
८.०० वाजले तरी O.T. तुन बाळाच्या आवाजा शिवाय काहीच येत नव्हतं..!!
बाळ इतकं का रडतयं?
बायको व्यवस्थित आहे ना?
"Ki" आहे कि "Ka" आहे?
त्यांना बाहेर आणायला इतका वेळ का लागतोय असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात सुरू होते..!
इतक्यात O.T. चा दरवाज़ा उघडला आणि बायकोला बाहेर आणण्यात आलं..
बायकोला बघुन जीव भांड्यात पडला..
प्रसुती सिझेरियन झाली आणि एका गोंडस परीचं आगमन झाल्याच कळलं..!!
मला नाचावं कि उड्या मारव्या तेच कळत नव्हतं..!!
परीचं रडणं काही थांबत नव्हतं आणि अजुन ती O.T. तच होती.
त्यामुळे जीव कासावीस होत होता..!
पुढची ५ मिनीटे एकदम सगळं थांबल्यासारखं झालं...
शेवटी परी दुपट्यात गुंडाळुन बाहेर आली,
पण तिच रडणं काही थांबत नव्हतं...
"जा पप्पाकडं", म्हणत नर्स ने परीला माझ्या हातात ठेवलं...!!
त्या इवल्याशा जिवाला पहिल्यांदा हातात घेतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता...!!
माझ्या तोंडातुन फक्त दोनचं शब्द बाहेर पडले "ये पिल्लु"...!!
(ती पोटात असताना जेव्हा केव्हा मी घरी असेल आणि ती हालचाल करायची तेव्हा मी नेहमी फक्त हेच बोलायचो 'ये पिल्लु', काय चाललयं?
मी तुझा बाबा बोलतोय..! मजेत ना !
तुझी आई वेडी आहे. तिचं नाही काही एेकायचं..!! माझंच एेकायचं)
आणि काय आश्चर्य..,
इतका वेळ जिवाच्या अकांताने रडणारी माझी लेक चक्क शांत झाली,
आणि माझ्याकडे एकटक बघायला लागली...!
जणु काही तिलाच मला पहायची घाई झाली होती...!
आता ती शांत झाली होती आणि माझ्या डोळ्यात पाणी...!
साक्षात्कार यालाच म्हणतात बहुतेक..!!
आजही ते दोन शब्द तिच्यासाठी आधार आहेत तर माझ्यासाठी माझा उद्धार..!
त्यामुळे मिशीदांचे ते वाक्य
"आकाशातला परमेश्वर अवचितपणे कधीतरी आपल्यावर प्रसन्न होतो,
आणि
सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आपल्या ओंजळीत अलगद टाकतो....!!
लोक त्याला आपली " मुलगी" म्हणतात.!!

Thursday, January 18, 2018

भारत आफ्रिका दौरा


अपेक्षेविरुद्ध आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना अत्यंत 'मऊ' झालेला आहे.टीम इंडियातली पोरं ही चाहत्यांच्या मर्जीनुसार नाही तर त्यांचा त्या दिवशी जसा मूड असेल त्यानुसार खेळतात हे नवीनच मला समजलेलं आहे.परदेशी खेळलेल्या प्रत्येक टेस्ट मॅच नंतर आपल्याला काय समजलं हे शिकून घ्यायचं काम मी आताही पार पाडलेलं आहे.तर दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर आपल्याला काय समजलं ह्याची यादी खालील प्रमाणे देत आहे.ज्याने त्याने आपापल्या वकुबानुसार त्यात भर घालावी..
१.आफ्रिकेच्या दौऱ्यावर नेलेले तिन्ही ओपनर्स हे एकाला झाका आणि दुसऱ्याला काढा असे आहेत.के राहुलपेक्षा धवन बरा असं वाटेपर्यंत राहुल आणि धवन हे दोघे विजय पेक्षा बरे आहेत असं वाटायला लागलं आहे.
२.मोहम्मद शमीने दुसरा आगरकर होण्याकडे वाटचाल सुरु केलेली आहे.
३.पुजारा हा मॅच खेळता खेळता मध्येच झोपा काढतो.झोपलेला माणूसच प्लेयरच्या हातात बॉल असताना धावायला सुरुवात करतो.दोन्ही डावात रन आऊट होणारा पहिला भारतीय खेळाडू होऊन त्याने हे सिद्ध केलेलं आहे.
४.विकेट किपरचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे विकेट किपिंग आहे.धोनीला जमली म्हणून त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक किपरला बॅटींग यायलाच हवी ही अपेक्षा चुकीची आहे.
५.वृद्धीमान सहा हाच आपला सगळ्यात बेस्ट विकेट किपर आहे.बॅटींगमध्ये कितीही माती खाल्ली तरी तो त्याच्या आजूबाजूला आलेला एकही कॅच सोडत नाही.
६.२००४ ते २०१८ ह्या चौदा वर्षात पार्थिव पटेलच्या किपिंगमध्ये काडीचाही फरक पडलेला नाही.तो तेव्हाही वाईट होता आताही तितकाच वाईट आहे.
७.हार्दिक पांड्या हे दिवाळीतलं रॉकेट आहे.एकदा वात पेटवली की कुठेही जाऊ शकतं.सध्या हे रॉकेट आपल्या घराला आग लावतंय. त्याला जर टेस्ट क्रिकेटमध्ये खेळवायचं असेल तर किरॉन पोलार्ड,ब्राव्हो वगैरे टोणग्या लोकांपासून त्याला कायमचं दूर ठेवलं पाहिजे.
८.रोहित शर्मा ही फक्त एकदिवसीय आणि टी20 सामन्यात आपली दुभती गाय आहे हे सिद्ध व्हायला आता फक्त एकच टेस्ट मॅच शिल्लक आहे.
९.ज्या वेगाने आपले संघ बदल होतायत ते पाहता राहाणे सोडून दौऱ्यावर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला संधी मिळायची दाट शक्यता आहे.पुढच्या मॅचला शास्त्री आणि संजय बांगर पॅड लावून उतरले तरी मला आश्चर्य वाटणार नाही 😁😁
१०.प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी संघातल्या अत्यंत दुर्लक्षित अती सामान्य खेळाडूला धावा किंवा विकेट्स बहाल करुन त्याची करियर घडवण्याची मोठी जबाबदारी ह्या सामन्यातही आपण पार पाडलेली आहे.पहिल्या डावात मार्करम आणि दुसऱ्या डावात लुंगीसानी नगीडी हे ह्या आठवड्याचे लकी विनर्स आहेत.
११.लास्ट बट नॉट द लिस्ट ..आपण आधीच्या टेस्ट मॅचमधून काहीही शिकत नसतो.उलट प्रत्येक टेस्टला अजूनच काहीतरी भयानक वेगळं करुन आपल्याच चाहत्यांचे डोळे दिपवून टाकायचं आपलं कसब वाखाणण्याजोगं आहे.
( भारतीय क्रिकेटचा अभ्यासक)
सौरभ परांजपे
१७/०१/२०१८

Tuesday, January 16, 2018

WhatsApp / Facebook



Unfortunately very true
बस झाल्या शुभेच्छा आता बस झाली फुले
- कवी संदीप खरे

बस झाल्या शुभेच्छा
आता बस झाली फुले
कसलं दिखाऊ आयुष्य झालं
या व्हाॅट्सअप मुळे

उठसुठ हॅप्पी बर्थडे
उठसूठ श्रध्दांजली
तोंडावर नाही हास्य
ना डोळ्यांमध्ये पाणी

एखादे दिवशी वेळ मिळाला
तर घरी जाऊन भेट
मोकळा नको होऊ
नुसता मारुन पॅक नेट

नको रमू आभासी दुनियेत
आभाळ सारे खुले
बस झाल्या शुभेच्छा
आता बस झाली फुले

भावना बिवना काही नाही
नुसती कॉपी पेस्ट
तासनतास् आयुष्य
नुसते घालवतो वेस्ट

इकडून आला तिकडे पाठवला
हेच नुसते चालते
खरं किती खोटं किती
कुणाला माहीत नसते

बुटकं झालं आयुष्य
भाऊ या इंटरनेट मुळे
बस झाल्या शुभेच्छा
आता बस झाली फुले

कुणी कुणी तर भाऊ
कहरच करुन टाकतो
इतक्या लोकांना पाठवा
म्हणून शपथ देऊन टाकतो

कीव वाटते 'शेअर कराच'
म्हणून कुणी हात जोड़तो
तेच-तेच मॅसेज टाकून
कुणी भंडावून ही सोडतो

असली विचित्र दुनिया झाली
आपलीच सर्व मुले
बस झाल्या शुभेच्छा
आता बस झाली फुले

कुठलीच गोष्ट वाईट नसते
WhatsApp / Facebook ही नाही
चांगला उपयोग करणे
हे मात्र आपल्याच ठायी

वैताग येतो कधी याचा
पण उपाय दुसरा नाही
नव्या जगाची नवी रीत
मनी खंत मात्र राही

निखळ आनंद गमावला
virtual सर्व झाले
बस झाल्या शुभेच्छा
आता बस झाली फुले
आता बस झाली फुले...!

Friday, January 12, 2018

"बूट...."



"बूट...."
लग्नघटिका जवळ येत चाललेली.
त्याच्या मनाची घालमेल.
त्याची एकुलती एक लेक.
तिचंच लग्न आज.
मोजकी माणसं.
साधासा हाॅल.
त्याला तेवढंच परवडण्यासारखं.
फोर्जींग कंपनीतला तो एक साधासा सुपरवायझर.
सुरवात हेल्परपासून.
ईच्छा खूप होती , पण नाही शिकता आलं.
अनुभव.
अनुभवातून खूप काही शिकता येतं.
तो शिकत गेला.
कुठल्याही कामाला कधी नाही म्हणलं नाही.
आता सुपरवायझर आहे.
छोटसं का होईना, डोक्यावर स्वतःचं छप्पर आहे.
त्याची बायकोही तशीच.
त्याला साजेशी.
आहे त्यात समाधान मानणारी.
सोन्याचे नाही, पण समाधानाचेच दागिने मिरवले आयुष्यभर.
नवर्याच्या कष्टांची जाणीव जपणारी.
होईल तेवढं वरकाम तीही करायची.
हाताला चव होती.
कुठं कुठं स्वयपाकाला जायची.
सरस्वती.
त्यांची एकुलती एक.
नाव सार्थ करणारी.
खरंच नाव काढलं पोरीनं.
हुशार आणि तेवढीच मेहनती.
कुठलंही कोचींग नाही.
परवडणेबल नव्हतंच.
स्वतःच्या जीवावर शिकली.
बी.सी.एस.ची फी सुद्धा जड गेली घराला.
तो हमखास डबल शिफ्ट करायचा.
आठवड्यातून तीनदा तरी.
चार पास दिवस लेकीशी गाठभेट व्हायची नाही.
सरू घरी येताना दाराकडे बघायची.
दारात बापाचे मळकट बूट बघितले की खुष.
पटकन् त्याला चहा करून द्यायची.
तिचं काॅलेज , तिचा अभ्यास.
तो कौतुकी कानांनी तृप्त ऐकायचा.
कष्ट सार्थकी लागल्यासारखा शांत झोपायचा.
त्याच्या लेकीच्या ऊज्वल ऊद्याची स्वप्न रंगवत.
तो आडवा झाला की त्याचे बूटही निवांत.
सर्जा राजाची जोडीच ती.
दिवसभर विश्रांती नसायची त्यांना.
घरधनी राब राब राबायचा.
तो झिजत होता.
त्याच्या बूटांचे तळवेही.
झिजण्यातला आनंद ऊपभोगत होते सगळे.
कंपनीनं दिलेले सेफ्टी शूज होते ते.
त्याला जीवापाड जपायचे.
सरू बी.सी.एस. झाली.
कॅम्पसमधनं सिलेक्ट झाली.
लगेच नोकरीला लागली.
छोट्याशा आय. टी. कंपनीत.
शहाणी पोर ती.
कष्टाच्या ईस्टेटीचा आपला हिस्सा मागून घेतला.
लगेचच.
दोन वर्ष प्रचंड मेहनत.
पैसा साठवत गेली.
मग पार्ट टाईम जाॅब आणि एम. सी. ए.
नोकरी आणि अभ्यास.
तारेवरची कसरत.
सर्कशीतल्या खेळाडूंचच घर ते.
जीवाशी खेळ सहज जमायचे.
ही दोन वर्ष झटकन् संपली.
पुन्हा कॅम्पस.
आता मात्र चांगली आॅफर.
दणकून पॅकेज.
आनंदी आनंद.
दोन वर्षात, त्याच्या बुटांच्या दोन जोड्या झिजून मेल्या.
कंपनीतून दर वर्षी नवीन मिळायचे.
नाहीतर ,एकच जोडी त्यानं आयुष्यभर दामटली असती.
पुन्हा डबलशिफ्ट.
पोरीचं लग्न.
जावई दारात चालून आला.
सरूच्याच कंपनीतला.
रीतसर मागणी घातली.
लग्न ठरलं सुद्धा.
साधसंच.
तरीही हाॅल , जेवण.
कापडचोपड.
किमान शंभर माणसं तरी.
लग्नाचा निम्मा खर्च मुलाकडचे करणार होते.
तरीही त्याचा हिस्सा बराच.
सरूनं किती म्हणलं.
नाही.
पोरीच्या पैशाला हात लावला नाही त्यानं.
जमवलं.
कंपनीच्या निळ्या वर्कशाॅपसूटची सवय शरीराला.
किती तरी वर्षांनी निळा सफारी चढवलेला.
सवयच नव्हती.
बूट कशाला हवेत ?
आपले आहेत की कंपनीतले.
सेफ्टी शूज.
पाॅलीश करून ठेवलेत काल.
नव्यासारखे.
चकचकीत.
तो तयार होता.
आत्ता मुलाकडची मंडळी येतील.
कुठे गेले बूट ?
सापडतच नाहीयेत.
तो प्रचंड अस्वस्थ.
हाॅलमधल्या त्या छोट्याशा खोलीत प्रचंड ऊलथापालथ.
तो अस्वस्थ.
एवढ्यात गलका.
मंडळी आली.
नातेवाईकांच्या गोतावळ्यातला जावई त्याच्या खोलीत शिरला.
डायरेक्ट.
'सासरेबुवा , मीच लपवले आहेत तुमचे बूट.'
त्याच्या मित्राने पिशवीतलं खोकं बाहेर काढलं.
कचकचीत नवे कोरे लेदर शूज.
स्वतःच्या हाताने सासर्याच्या पायात चढवले.
मनोभावे पाया पडला.
तो हिप्नोटाॅईज झाल्यासारखा.
" आता निवांत.
डबल शिफ्ट बंद.
पळण्याचे दिवस संपले.
या बुटांनी मजेत चालायचं.
मस्त रहायचं.
निवांत.
एरवी जावयाचे बूट पळवतात.
मी म्हणलं, आपण सासर्याचे पळवू.
राबणार्या हातांईतकेच, पळणारे पाय तेवढेच महत्वाचे.
त्यांना जपायला हवंच.
तुमची लेक जपून ठेवणार आहे ते बूट."
बूटांची अशी पळवापळवी पहिल्यांदाच.
तो हिप्नोटाॅईज.
जावयाचे हात हातात घेतले.
शब्दांशिवाय बरंच काही बोलला.
एक टपोरा थेंब नव्या बुटांवर टप्पकन सांडला.
आपल्या हातानं ,त्याच्या जावयानं तो पटकन् पुसला.
जगातला सगळ्यात 'श्रीमंत' माणसाच्या मुलीचं लग्न आनंदात पार पडलं.
कुर्यात सदा मंगलम !

Saturday, January 06, 2018

Suvichar


from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग http://ift.tt/2m2VCBs
via IFTTT

Punha पुन्हा


from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग http://ift.tt/2qvWcgr
via IFTTT