संध्याकाळी ७.०० च्या सुमारास बाळ येण्याची चाहुल लागली तसा,
मी O.T. पुढे कान देऊन आणि डोळे विस्फारुन येरझारया मारु लागलो..!!
७.३८ वाजता बाळाच्या रडण्याचा आवाज आला.
आणि मी बाळाच्या स्वागतासाठी O.T. च्या बाहेर सज्ज झालो..!
रात्रीच्या शांततेत बाळाच्या रडण्याचा आवाज (बापाच्या आवाजाला खुन्नस) संपुर्ण हाॅस्पिटल दणाणुन सोडत होता.
आणि पहिलाच गुण बापाचा घेतल्याचं आत्मिक समाधान देत होता..!
८.०० वाजले तरी O.T. तुन बाळाच्या आवाजा शिवाय काहीच येत नव्हतं..!!
बाळ इतकं का रडतयं?
बायको व्यवस्थित आहे ना?
"Ki" आहे कि "Ka" आहे?
त्यांना बाहेर आणायला इतका वेळ का लागतोय असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात सुरू होते..!
इतक्यात O.T. चा दरवाज़ा उघडला आणि बायकोला बाहेर आणण्यात आलं..
बायकोला बघुन जीव भांड्यात पडला..
प्रसुती सिझेरियन झाली आणि एका गोंडस परीचं आगमन झाल्याच कळलं..!!
मला नाचावं कि उड्या मारव्या तेच कळत नव्हतं..!!
परीचं रडणं काही थांबत नव्हतं आणि अजुन ती O.T. तच होती.
त्यामुळे जीव कासावीस होत होता..!
पुढची ५ मिनीटे एकदम सगळं थांबल्यासारखं झालं...
शेवटी परी दुपट्यात गुंडाळुन बाहेर आली,
पण तिच रडणं काही थांबत नव्हतं...
"जा पप्पाकडं", म्हणत नर्स ने परीला माझ्या हातात ठेवलं...!!
त्या इवल्याशा जिवाला पहिल्यांदा हातात घेतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता...!!
माझ्या तोंडातुन फक्त दोनचं शब्द बाहेर पडले "ये पिल्लु"...!!
(ती पोटात असताना जेव्हा केव्हा मी घरी असेल आणि ती हालचाल करायची तेव्हा मी नेहमी फक्त हेच बोलायचो 'ये पिल्लु', काय चाललयं?
मी तुझा बाबा बोलतोय..! मजेत ना !
तुझी आई वेडी आहे. तिचं नाही काही एेकायचं..!! माझंच एेकायचं)
आणि काय आश्चर्य..,
इतका वेळ जिवाच्या अकांताने रडणारी माझी लेक चक्क शांत झाली,
आणि माझ्याकडे एकटक बघायला लागली...!
जणु काही तिलाच मला पहायची घाई झाली होती...!
आता ती शांत झाली होती आणि माझ्या डोळ्यात पाणी...!
साक्षात्कार यालाच म्हणतात बहुतेक..!!
आजही ते दोन शब्द तिच्यासाठी आधार आहेत तर माझ्यासाठी माझा उद्धार..!
त्यामुळे मिशीदांचे ते वाक्य
"आकाशातला परमेश्वर अवचितपणे कधीतरी आपल्यावर प्रसन्न होतो,
आणि
सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आपल्या ओंजळीत अलगद टाकतो....!!
लोक त्याला आपली " मुलगी" म्हणतात.!!
☺
No comments:
Post a Comment