अपेक्षेविरुद्ध आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना अत्यंत 'मऊ' झालेला आहे.टीम इंडियातली पोरं ही चाहत्यांच्या मर्जीनुसार नाही तर त्यांचा त्या दिवशी जसा मूड असेल त्यानुसार खेळतात हे नवीनच मला समजलेलं आहे.परदेशी खेळलेल्या प्रत्येक टेस्ट मॅच नंतर आपल्याला काय समजलं हे शिकून घ्यायचं काम मी आताही पार पाडलेलं आहे.तर दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर आपल्याला काय समजलं ह्याची यादी खालील प्रमाणे देत आहे.ज्याने त्याने आपापल्या वकुबानुसार त्यात भर घालावी..
१.आफ्रिकेच्या दौऱ्यावर नेलेले तिन्ही ओपनर्स हे एकाला झाका आणि दुसऱ्याला काढा असे आहेत.के राहुलपेक्षा धवन बरा असं वाटेपर्यंत राहुल आणि धवन हे दोघे विजय पेक्षा बरे आहेत असं वाटायला लागलं आहे.
२.मोहम्मद शमीने दुसरा आगरकर होण्याकडे वाटचाल सुरु केलेली आहे.
३.पुजारा हा मॅच खेळता खेळता मध्येच झोपा काढतो.झोपलेला माणूसच प्लेयरच्या हातात बॉल असताना धावायला सुरुवात करतो.दोन्ही डावात रन आऊट होणारा पहिला भारतीय खेळाडू होऊन त्याने हे सिद्ध केलेलं आहे.
४.विकेट किपरचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे विकेट किपिंग आहे.धोनीला जमली म्हणून त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक किपरला बॅटींग यायलाच हवी ही अपेक्षा चुकीची आहे.
५.वृद्धीमान सहा हाच आपला सगळ्यात बेस्ट विकेट किपर आहे.बॅटींगमध्ये कितीही माती खाल्ली तरी तो त्याच्या आजूबाजूला आलेला एकही कॅच सोडत नाही.
६.२००४ ते २०१८ ह्या चौदा वर्षात पार्थिव पटेलच्या किपिंगमध्ये काडीचाही फरक पडलेला नाही.तो तेव्हाही वाईट होता आताही तितकाच वाईट आहे.
७.हार्दिक पांड्या हे दिवाळीतलं रॉकेट आहे.एकदा वात पेटवली की कुठेही जाऊ शकतं.सध्या हे रॉकेट आपल्या घराला आग लावतंय. त्याला जर टेस्ट क्रिकेटमध्ये खेळवायचं असेल तर किरॉन पोलार्ड,ब्राव्हो वगैरे टोणग्या लोकांपासून त्याला कायमचं दूर ठेवलं पाहिजे.
८.रोहित शर्मा ही फक्त एकदिवसीय आणि टी20 सामन्यात आपली दुभती गाय आहे हे सिद्ध व्हायला आता फक्त एकच टेस्ट मॅच शिल्लक आहे.
९.ज्या वेगाने आपले संघ बदल होतायत ते पाहता राहाणे सोडून दौऱ्यावर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला संधी मिळायची दाट शक्यता आहे.पुढच्या मॅचला शास्त्री आणि संजय बांगर पॅड लावून उतरले तरी मला आश्चर्य वाटणार नाही 😁😁
१०.प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धी संघातल्या अत्यंत दुर्लक्षित अती सामान्य खेळाडूला धावा किंवा विकेट्स बहाल करुन त्याची करियर घडवण्याची मोठी जबाबदारी ह्या सामन्यातही आपण पार पाडलेली आहे.पहिल्या डावात मार्करम आणि दुसऱ्या डावात लुंगीसानी नगीडी हे ह्या आठवड्याचे लकी विनर्स आहेत.
११.लास्ट बट नॉट द लिस्ट ..आपण आधीच्या टेस्ट मॅचमधून काहीही शिकत नसतो.उलट प्रत्येक टेस्टला अजूनच काहीतरी भयानक वेगळं करुन आपल्याच चाहत्यांचे डोळे दिपवून टाकायचं आपलं कसब वाखाणण्याजोगं आहे.
( भारतीय क्रिकेटचा अभ्यासक)
सौरभ परांजपे
१७/०१/२०१८

No comments:
Post a Comment