अनुबंध. मनाच्या कानाकोपऱ्यात दरवळणारा सुगंध तू सावळ्या रूपाचा हृदयाशी घडलेला अनुबंध तू आखीव रेखीव कोरलेला सौंदर्याचा प्रबंध तू उत्कट ओढीचा काव्यमय ओघवता मुक्तछंद तू आशेच्या सुमनांतुन द्रवलेला मधुर मकरंद तू जगण्याचे भान विसरून उरलेला आनंद तू तुष्की नागपुरी

from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग http://bit.ly/2OSam3T
via
IFTTT
No comments:
Post a Comment