*३ एप्रिल १६८०* आजच्या दिवशी आमच्या राजाने आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवून या स्वराज्याचा निरोप घेतला. शिवस्मृतिदिनानिमित्त राजांना विनम्र अभिवादन.🙏 *जय शिवराय* 🙏 शोधू कुठं रं, धावू कसं रं? मीच स्वतःला पाहू कसं रं? ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला रं! माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं शोधू कुठं रं, धावू कसं रं? मीच स्वतःला पाहू कसं रं? श्वास हे गहाण, बदलले किती जन्म मी! पायाची वहाण, होऊ दे रे एकदा तरी! डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो! डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो! मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रं… माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं शोधू कुठं रं, धावू कसं रं? मीच स्वतःला पाहू कसं रं? माझ्या शिवबा रं. -क्षितिज पटवर्धन pic credit - https://ift.tt/2OJxXnk

from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग https://ift.tt/2Us89Bw
via
IFTTT
No comments:
Post a Comment