इच्छा विपत्ति मध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्ती मध्ये मी भयभीत होऊ नये इतकीच माझी इच्छा!! दुक्ख तापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही... दुक्खावर जय मिलवता यावा इतकीच माझी इच्छा. माझ्या मदतीला कोणी न आल्यास माझे बळ मोडून पडू नये इतकीच माझी इच्छा. माझे रक्षण तू करावेस, मला तारावेस ही माझी इच्छा नाही, तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे इतकीच माझी इच्छा. माझे ओझे हलके करून तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही ते ओझे वहायाची ताकद माझ्यात असावी इतकीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक होउन मी तुझा चेहरा ओलखुन काढीन. दुख्खाच्या रात्री सगळे जग जेव्हा माझी फसवनूक करेल तेव्हा तुज्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये इतकीच माझी इच्छा! रविंद्रनाथ टागोर

from Marathi Kavita Blog मराठी कविता ब्लॉग http://bit.ly/2GiVKXE
via
IFTTT
No comments:
Post a Comment